Indian Cricket Team : इंडियन प्रीमियर लीगमध्ये शानदार प्रदर्शन करुन अनेक खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवलय. मागच्यावर्षी दिनेश कार्तिकने या लीगमध्ये छाप सोडली होती. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडे झाले. टीम इंडियात पुनरागमनाच्या इराद्याने असाच एक खेळाडू आयपीएलमध्ये उतरलाय. या खेळाडूला आयपीएल 2023 च्या पहिल्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्या वर्षभरापासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी हा खेळाडू संघर्ष करतोय.
टीम इंडियानंतर आयपीएलमधूनही पत्ता कट
टीम इंडियाकडून खेळलेला दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. पण सीजनच्या पहिल्या मॅचमध्ये प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळालं नाही. अजिंक्य रहाणे मागच्या बऱ्याच काळापासून टीम इंडियाचा भाग नाहीय. आता त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. चेन्नई सुपर किंग्सच टीम कॉम्बिनेशन पाहिल्यास आागमी मॅचेसमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
टीम इंडियाकडून खेळताना किती धावा केल्यात?
अजिंक्य रहाणेने टीम इंडियाकडून खेळताना 82 टेस्ट मॅचेसमध्ये 4931 धावा केल्या आहेत. यात 12 सेंच्युरी आहेत. 90 वनडे सामन्यात 2962 धावा केल्या आहेत. 20 टी 20 सामन्यात त्याने 375 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने काही टूरवर टीम इंडियाच नेतृत्व सुद्धा केलय. टीम इंडियाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरीज 2-1 ने जिंकली. त्यावेळी अजिंक्य रहाणे टीमचा कॅप्टन होता. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक शतकही झळकवल होतं.
शेवटचा सामना कधी खेळला?
अजिंक्य रहाणे टीम इंडियाकडून शेवटचा सामना मागच्यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला पुन्हा टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही. भारतीय क्रिकेट बोर्डाने 2022-23 साठी वार्षिक कॉन्ट्रॅक्टची यादी जाहीर केली. या लिस्टमध्ये अजिंक्य रहाणेच नाव नाहीय. त्यामुळे करियरच्या दृष्टीने अजिंक्य रहाणेसाठी हा सीजन महत्वाचा आहे.