कोच्ची: IPL 2023 चा लिलाव सुरु व्हायला आता काही वेळ उरला आहे. कोच्चीमध्ये शुक्रवारी लिलाव रंगेल. ऑक्शनमध्ये एकूण 405 क्रिकेटर्सवर बोली लागेल. या मिनी ऑक्शनमध्ये 30 परदेशी खेळाडूंसह एकूण 87 जागा आहेत. या ऑक्शनमध्ये असे तीन प्लेयर्स आहेत, ज्यांच्यावर सर्वाधिक बोली लागेल. बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन आणि सॅम करन हे ते तीन खेळाडू आहेत. या तिघांना विकत घेण्यासाठी 10 फ्रेंचायजीमध्ये स्पर्धा रंगेल. ऑलराऊंडर्सना नेहमीच जास्त पैसा मिळतो. आयपीएल लिलावाच्या इतिहासात आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर ख्रिस मॉरिसला सर्वाधिक 16.25 कोटी रुपये मिळालेत. आता या खेळाडूने सन्यास घेतलाय.
त्या तिघांवर पैशांचा पाऊस
सॅम करनला 2019 साली पंजाब किंग्सने मोठी रक्कम खर्च करुन विकत घेतलं होतं. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. चेन्नई पुन्हा एकदा त्याला आपल्या ताफ्यात घेण्याचा प्रयत्न करेल. पाठीच्या दुखण्यामुळे तो मागच्या सीजनमध्ये खेळला नव्हता. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन बेन स्टोक्स चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हॅरी ब्रुकवर सुद्ध मोठी बोली लागू शकते. ब्रूकने मर्यादीत ओव्हर्समध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केलीय. पाकिस्तान दौऱ्यात त्याने सलग तीन शतक ठोकलीत.
या ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लक्ष
ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनवरही लक्ष असेल. यावर्षी भारत दौऱ्यावर आलेल्या ग्रीनने जबरदस्त बॅटिंग केली होती. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियम्सनही लिलावात आहे. त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे. इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कॅप्टन बेन स्टोक्सलाही भरपूर पैसा मिळू शकतो. त्याने टी 20 मध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केलीय.