IPL 2023 : क्रिकेटसाठी महालासारख घर सोडलं, देश सोडला, आता बनलाय धोनीचा ‘विराट’

| Updated on: Apr 25, 2023 | 12:39 PM

IPL 2023 : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ससाठी हा खेळाडू तुरुपचा एक्का बनलाय. फक्त क्रिकेट खेळण्यासाठी म्हणून त्याने महालसारखं घर, देश सोडला. या प्लेयरने 12 एप्रिलनंतर मागे वळून बघितलेलं नाही.

IPL 2023 : क्रिकेटसाठी महालासारख घर सोडलं, देश सोडला, आता बनलाय धोनीचा विराट
CSK IPL 2023
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

CSK IPL 2023 : IPL 2023 च्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 7 पैकी 5 मॅच जिंकून ही टीम टॉपवर पोहोचली आहे. चेन्नईची टीम टॉपवर येण्यात अनेक खेळाडूंच योगदान आहे. पण यात सर्वात पुढे डावखुरा फलंदाज डेवॉन कॉनवे आहे. चालू सीजनमध्ये कॉनवे तडाखेबंद बॅटिंग करतोय. कॉनवेने या सीजनमध्ये सलग चार अर्धशतक झळकावली आहेत. त्याच्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे चेन्नईची टीम दोन पावलं पुढे आहे.

डेवन कॉनवेने या सीजनमध्ये आतापर्यंत 7 सामन्यात 314 धावा केल्या आहेत. या खेळाडूची सरासरी 50 च्या पुढे असून स्ट्राइक रेट 143 पेक्षा जास्त आहे. कॉनवेने 12 सिक्स आणि 33 फोर मारलेत. कॉनवेच्या कामगिरी सातत्य आहे. त्या बाबतीत तो विराट कोहलीच्या जवळ जातो.

त्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही

डेवन कॉनवेने या सीजनमध्ये अर्धशतकाचा चौकार ठोकलाय. पहिल्या तीन सामन्यात कॉनवेने खास कामगिरी केली नव्हती. पण 12 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने 50 धावा फटकावल्या. त्यानंतर कॉनवेने मागे वळून बघितलेलं नाही. या खेळाडूने आरसीबी विरुद्ध 83 धावा फटकावून टीमला विजय मिळवून दिला.

धोनीला सापडला त्याचा विराट

सनरायजर्स विरुद्ध नाबाद 77 धावा फटकावून तो टीमच्या विजयाचा नायक बनला. आता कोलकाता विरुद्ध सुद्धा त्याने 56 धावा फटकावल्या. धोनीला त्याचा विराट कोहली सापडलाय, असं म्हणायला आता हरकत नाही.

कॉनवेची अजब गोष्ट

डेवन कॉनवे न्यूझीलंडकडून खेळतो. पण तो मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. त्याने अनेक वर्ष दक्षिण आफ्रिकेत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलाय. पण संधी मिळत नव्हती, म्हणून त्याने देश सोडला. कॉनवे एका मोठ्या घराण्याशी संबंधित आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याची प्रॉपर्टी आहे. मोठं घर आहे. पण क्रिकेटसाठी तो न्यूझीलंडला स्थायिक झाला. त्याचा निर्णय योग्य ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या खेळाडूने आता चांगलं नाव कमावलय.