CSK vs LSG IPL 2023 : महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी लखनौ सुपर जायंट्स टीमचा 12 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्स विरुद्ध पहिला सामना 5 विकेट्सने गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने जबरदस्त कमबॅक केलं. चेन्नईचा आयपीएल 2023 मधील हा पहिला विजय आहे. चेन्नई सुपर किंग्सला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 12 धावांनी विजय मिळवून देण्य़ासाठी CSK चा ऑलराऊंडर मोईन अलीची मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
मोईन अलीने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध घातक गोलंदाजी केली. त्याने 4 ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 4 विकेट्स काढल्या. मोईन अलीला यासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. चेन्नईमध्ये सीएसके विरुद्ध LSG सामना झाला. खरंतर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी मोईन अली नाही, चेन्नईचा दुसरा एक मोठा खेळाडू दावेदार होता. मोईन अली समोर त्या खेळाडूच्या कामगिरीकडे कोणाच लक्ष गेलं नाही. तो खेळाडू नसता, तर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव निश्चित होता.
सरळसरळ अन्याय
चेन्नई सुपर किंग्सच्या या प्लेयरवर सरळसरळ अन्याय झाला. चेन्नई सुपर किंग्सला स्वबळावर विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नाही. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्टार प्लेयर स्वत: कॅप्टन एमएस धोनी आहे. या मॅचमध्ये धोनीने तुफान बॅटिंग केली. त्याने 3 चेंडूत 12 धावा फटकावल्या. धोनीच्या या छोट्या इनिंगमध्ये 2 सिक्स होत्या.
त्या 12 धावा निर्णायक
चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी लखनौ सुपर जायंट्स टीमला 12 धावांनी हरवलं. अखेरीस धोनीची 12 धावांची खेळी चेन्नईच्या विजयात महत्वपूर्ण ठरली. लखनौ विरुद्ध धोनीने अखेरीस 3 चेंडूत 12 धावा फटकावल्या नसत्या, तर चेन्नईचा पराभव सुद्धा झाला असता. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या जय-पराजयामध्ये धोनीच्या त्या 12 धावा निर्णायक ठरल्या. चेन्नईने पहिली बॅटिंग करताना सात विकेटवर 217 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ टीमने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 205 धावा केल्या.