MI vs CSK IPL 2023 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये काल वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. यंदाच्या सीजनमधली दोन्ही टीम्सची ही पहिलीच मॅच होती. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. त्यांनी मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानात 7 विकेटने पराभव केला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं 158 धावांच लक्ष्य चेन्नई सुपर किंग्सने 18.1 ओव्हर्समध्ये आरामात पार केलं. अजिंक्य रहाणेच्या आक्रमणाने मुंबईच्या गोलंदाजाची धार बोथट केली. मुंबईचाच हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.
चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने दमदार डेब्यु केला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने वेगवान अर्धशतकी खेळी केली. त्याने केलेल्या आक्रमणातून मुंबईचे गोलंदाज शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. चेन्नईने आरामात यंदाच्या सीजनमधील दुसरा विजय मिळवला.
चेन्नईसाठी एक चिंता वाढवणारी बाब
चेन्नईच्या टीमने मुंबई इंडियन्स विरुद्ध दमदार विजय मिळवला असला, तरी त्यांच्यासाठी एक चिंता वाढवणारी बाब आहे. चेन्नईचा प्रमुख ऑलराऊंडर दीपक चाहरला दुखापत झालीय. मुंबई इंडियन्स विरुद्ध काल पहिली ओव्हर टाकल्यानंतर त्याला मैदान सोडाव लागलं. दीपक चाहरची हॅमस्ट्रिंगची दुखापत बळावली आहे.
सोडाव लागलं मैदान
पहिल्या ओव्हरमधील पाचवा चेंडू टाकल्यानंतर दीपक चाहरने फिजियोला बोलावलं. मैदानात त्याने ट्रीटमेंट घेतली. त्यानंतरही त्याला त्रास जाणवत होता. त्यामुळे ओव्हरमधील लास्ट चेंडू टाकल्यानंतर त्याने मैदान सोडलं.
Deepak Chahar have pulled his hamstring and he did walk back with physio after bowling just 1 over!
Deepak Chahar and his injury issue continues!
Not a good sign for CSK!#TATAIPL#IPL2023#MIvCSK pic.twitter.com/ZOje6AtkNh
— Nilesh G (@oye_nilesh) April 8, 2023
किती सामन्यांना मुकणार?
दीपक चाहरची डाव्या पायाची हॅमस्ट्रिंग इंजरी पुन्हा बळावली आहे. त्यामुळे तो पुढच्या 4 ते 5 आयपीएल सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. याच हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे दीपक चाहर मागच्यावर्षी संपूर्ण आयपीएल सीजन खेळू शकला नव्हता.
धोनी काय म्हणाला?
सुरेश रैना जियो सिनेमासाठी कॉ़मेंट्री करत होता. “दीपकची पुन्हा हॅमस्ट्रिंगची दुखापत बळावली आहे. तो कदाचित पुढचे 4 ते 5 सामने खेळणार नाही” असं रैना कॉमेंट्री करताना म्हणाला. “दीपक चाहर पहिल्या ओव्हरनंतर गोलंदाजी करु शकला नाही, तरीही चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला, हे समाधानकारक आहे” असं कॅप्टन एमएस धोनी सामन्यानंतर म्हणाला.