Hardik pandya IPL 2023 : 10 इनिंगमध्ये एकही हाफ सेंच्युरी नाही, पण हार्दिकचा टीममधील एका प्लेयरवर भरपूर विश्वास

| Updated on: May 15, 2023 | 4:17 PM

Hardik pandya IPL 2023 : हार्दिकचा टीममधील एका प्लेयरवर भरपूर विश्वास आहे. अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. 10 मॅचमध्ये त्याने एकही हाफ सेंच्युरी झळकवलेली नाही. पण, तरीही तो कॅप्टन हार्दिक पंड्याच मुख्य अस्त्र आहे.

Hardik pandya IPL 2023 : 10 इनिंगमध्ये एकही हाफ सेंच्युरी नाही, पण हार्दिकचा टीममधील एका प्लेयरवर भरपूर विश्वास
ipl 2023 Hardik pandya
Image Credit source: IPL
Follow us on

अहमदाबाद : T20 क्रिकेटच वैशिष्टयच हेच आहे. इथे फक्त मोठ्या इनिंग खेळणारा प्लेयर स्टार होत नाही. छोट्या पण प्रभावी इनिंग खेळणारा प्लेयर सुद्धा मॅच विनर असतो. गुजरात टायटन्स आयपीएलमधील एक यशस्वी टीम आहे. मागच्या सीजनमध्ये या टीमने जेतेपद मिळवलं होतं. त्यांचा हा दुसरा सीजन आहे. IPL 2023 मध्ये सुद्धा गुजरात टायटन्सचा दबदबा आहे. पॉइंट्स टेबलमध्ये ही टीम पहिल्या स्थानावर आहे. अजून एखाद-दुसऱ्या विजयानंतर ही टीम प्लेऑफमध्ये दाखल होईल.

बॅटिंग-बॉलिंगमध्ये असलेला बॅलन्स ही या टीमची मुख्य ताकत आहे. बॅट्समनबद्दल बोलायच झाल्यास, वृद्धिमान साहा, शुभमन गिल, स्वत: कॅप्टन हार्दिक असे प्लेयर टॉप ऑर्डरमध्ये आहेत.

….म्हणून कॅप्टन पंड्याचा त्याच्यावर विश्वास

लोअर ऑर्डरमध्ये सुद्धा डेविड मिलर, राहुल तेवतिया आणि राशिद खान सारखे मॅच फिनिशर आहेत. त्यामुळे हा एक संतुलित आणि बलाढ्य संघ आहे. याच टीमचा एक प्लेयर डेविड मिलर अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. 10 मॅचमध्ये त्याने एकही हाफ सेंच्युरी झळकवलेली नाही. पण, तरीही तो कॅप्टन हार्दिक पंड्याच मुख्य अस्त्र आहे. छोट्या पण उपयुक्त मॅच विनिंग इनिंग तो खेळतो. त्यामुळे कॅप्टन पंड्याचा त्याच्यावर विश्वास आहे.

160 चेंडूत 242 धावा

डेविड मिलरच्या बाबतीत आयपीएल 2016 मध्ये सुद्धा असच झालं होतं. 8 इनिंगमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकवल नव्हतं. 2016 आणि 2023 च्या डेविड मिलरमध्ये प्रचंड फरक आहे. IPL 2023 च्या सीजनमध्ये डेविड मिलरने 11 सामन्यात 10 इनिंगमध्ये 160 चेंडूंचा सामना केलाय. त्याने 242 धावा केल्या आहेत. 151.25 चा त्याचा स्ट्राइक रेट आहे. गुजरात टायटन्सच्या टीममधील हा तिसरा चांगला स्ट्राइक रेट आहे. मागच्या 10 पैकी 5 इनिंगमध्ये तो नाबाद राहिलाय. 46 ही त्याची बेस्ट धावसंख्या आहे.

गुजरात टायटन्सचा पुढचा सामना कोणाबरोबर?

आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सची टीम आतापर्यंत 12 सामने खेळली असून त्यांचे 16 पॉइंट्स आहेत. त्यांनी सनरायजर्स हैदराबादच्या टीमला हरवलं, तर ते प्लेऑफमध्ये दाखल होतील. दुसऱ्याबाजूला सनरायजर्स हैदराबाद टीमचा पराभव झाला, तर आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सनंतर बाहेर होणारा तो दुसरा संघ ठरेल.