दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 7 वा सामना हा दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. गुजरातने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार असेलला ऋषभ पंत याने स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. दिल्लीच्या या सामन्यात होम ग्राउंडमध्ये पंतने हजेरी लावल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये रस्ते अपघात झाला होता. पंत तेव्हापासून झाल्याने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
ऋषभच्या या हजेरीमुळे संपूर्ण स्टेडियममध्ये एकच माहोल पाहायला मिळाला. ऋषभ पंत सामन्यादरम्यान काठीच्या आधाराने चालताना दिसला. यावेळेस राजीव शुक्ला यांनी ऋषभची आत्मियतेने चौकशी केली. ऋषभ दिल्लीचा नियमित कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन आहे. मात्र यंदा त्याला अपघातातून झालेल्या दुखापतीमुळे 16 व्या मोसमात खेळता आलं नाही. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर याला या हंगामात नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंतच्या जागी टीममध्ये
अभिषेक पोरेल याचा समावेश केला गेला आहे. पोरेल याला 20 लाख रुपये मोजून आपल्या टीममध्ये घेतलं आहे.
अभिषेक याने 16 फर्स्ट क्लास आणि 3 लिस्ट ए सामन्यांमध्ये बंगळुरुचं प्रतिनिधित्व केलं आहे. पंत याच्या अपघातामुळे अभिषेक याला ही संधी मिळाली आहे. आता संपूर्ण मोसमात अभिषेक विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. यामुळे अभिषेक कशी कामगिर करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
ऋषभ पंतची सामन्याला हजेरी
Look who's here supporting the @DelhiCapitals – RP 17 ??#TATAIPL pic.twitter.com/56Dd0Tw7NE
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2023
डेविड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, एसएन खान, आरआर रोस्सोव, अमन हकिम खान, एआर पटेल, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, एनरिक नार्त्झे आणि मुकेश कुमार.
हार्दिक पंड्या (कर्णधार) , वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलार, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल आणि अलझारी जोसेफ.