नवी दिल्ली | आयपीएल 16 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात पंजाब किंग्स टीमच्या युवा प्रभासिमरन सिंह याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध जबरदस्त शतक ठोकलं आहे. प्रभासिमरन याने चौकार ठोकत आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक पूर्ण केलं. प्रभासिमरनने 61 बॉलच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. प्रभाने या शतकी खेळीत 10 चौकार आणि 6 खणखणीत सिक्स ठोकले. प्रभासिमरन सिंह हा पंजाब किंग्स टीमकडून आयपीएलमध्ये शतक करणारा 12 वा फलंदाज ठरला आहे.
आतापर्यंत पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये एकूण 12 फलंदाजांनी 14 शतकं ठोकली आहेत. यामध्ये केएल राहुल आणि हाशिम आमला या दोघांनी सर्वाधिक प्रत्येकी 2 वेळा शतकं केली आहेत. इतकंच नाही, तर प्रभासिमरन पंजाबकडून शतक ठोकणारा तिसरा अनकॅप्डन बॅट्समन ठरला आहे. याआधी पॉल वॅलथॅटी आणि शॉन मार्श यांनी ही कामगिरी केली होती.
तसेच प्रभासिमरन सिंह हा या आयपीएल 16 मोसमात शतक करणारा दुसरा अनकॅप्ड आणि एकूण 5 वा फलंदाज ठरलाय. या हंगामात प्रभासिमरन याच्याआधी हॅरी ब्रूक, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल (अनकॅप्ड) आणि सूर्यकुमार यादव यांनी शतक ठोकलं आहे. अनकॅप्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर न खेळलेला खेळाडू.
प्रभासिमरन सिंह याचा शतकी फटका
Relive that special ? moment here ?#TATAIPL | #DCvPBKS https://t.co/eBGUL8gkVh pic.twitter.com/uWI2uW8vB8
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2023
प्रभासिमरन सिंह याने केलेल्या या शतकामुळे दिल्लीला विजयासाठी 168 धावांचं आव्हान मिळालं आहे प्रभासिमरन सिंह शतक ठोकल्यानंतर आऊट झाला. प्रभा 65 बॉलमध्ये 103 धावा करुन आऊट झाला. प्रभाला मुकेश कुमार याने बोल्ड केला. प्रभाव्यतिरिक्त सॅम करन याने 20 तर सिंकदर रजा याने नाबाद 11 धावा केल्या. या दोघांशिवाय एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.
दिल्लीकडून इशांत शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव, प्रवीण दुबे आणि मुकेश कुमार या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरान, सिकंदर रझा, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.
दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रोसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार.