मोठी बातमी – IPL 2023 च्या पार्टीत एका स्टार खेळाडूने महिलेसोबत केलं गैरवर्तन

| Updated on: Apr 27, 2023 | 1:39 PM

IPL 2023 : रात्री 10 नंतर खेळाडूच्या रुममध्ये कोणालाही प्रवेश नाही. आयपीएलच्या एका पार्टीत खेळाडूने महिलेसोबत गैरवर्तन केल्याच समोर आलय. त्यानंतर निर्बंध अजून कडक झालेत.

मोठी बातमी - IPL 2023 च्या पार्टीत एका स्टार खेळाडूने महिलेसोबत केलं गैरवर्तन
ipl party
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएल 2023 च्या पार्टीत एका स्टार खेळाडूने महिलेसोबत गैरवर्तन केल्याच समोर आलं आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंसाठीची अचारसंहिता अजून कडक केली आहे. या घटनेनंतर दिल्ली फ्रेंचायजीने नवीन निर्बंध घातले आहेत. खेळाडूंच्या रुमममध्ये प्रवेश करण्यासाठी पाहुण्यांना परवानगी घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय रात्री 10 वाजल्यानंतर कुठल्याही पाहुण्याला परवानगी मिळणार नाही, हे दिल्ली फ्रेंचायजीने स्पष्ट केलय.

खेळावरुन प्लेयर्सच लक्ष हटू नये, यासाठी दिल्ली फ्रेंचायजीने हा निर्णय घेतलाय. आयपीएलच्या पार्टीत कुठल्या प्लेयरने महिलेसोबत गैरवर्तन केलं, ते अजून समोर आलेलं नाही.

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय

सनरायजर्स हैदराबादवरील विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सने खेळाडू आणि स्टाफसाठी अचारसंहिता लागू केलीय. फ्रेंचायजीची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी दिल्ली कॅपिटल्सने हा निर्णय घेतलाय. दिल्ली कॅपिटल्सच्या एका खेळाडूने पार्टीत महिलोसबत गैरवर्तन केलं. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलय.

दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेयर्ससाठी अचारसंहिता काय आहे?

ओळखीपाळखीच्यानाही रात्री 10 नंतर दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू थांबलेल्या रुममध्ये प्रवेश मिळणार नाही. रुममध्ये प्रवेशासाठी फोटो ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यासाठी आयपीएलमधील अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे. हॉटेलचे रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये खेळाडू त्यांचे नातलग, परिचितांना भेटू शकतात. तिथे त्यांच्यावर कुठलही बंधन नसेल.

रात्री 10 नंतर कोणालाही खेळाडूंच्या रुममध्ये प्रवेश मिळणार नाही.

रुममध्ये जाण्यासाठी फोटो ओळखपत्र आणि आयपीएल अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे.

हॉटेलमधून बाहेर जाताना खेळाडूंना फ्रेंचायजीला सांगण बंधनकारक आहे.

पत्नी आणि गर्लफ्रेंड येऊ शकतात, पण स्वत:च्या खर्चाने

कुटुंबिय येत असतील, तर खेळाडूंना तस फ्रेंचायजीला सांगाव लागेल.

फ्रेंचायजीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, सर्व खेळाडूंना बंधनकारक असेल.

अचारसंहितेच उल्लंघन केल्यास दंड किंवा कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ शकतो.

पॉइंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम कुठे?

दिल्ली कॅपिटल्सने खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडला टीमसोबत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यांचे खर्च हे त्या खेळाडूलाच उचलावे लागणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सला या सीजनमध्ये विशेष प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्लीची टीम तळाला आहे. 7 पैकी त्यांनी फक्त 2 सामने जिंकलेत.