IPL मध्ये 9.75 कोटी रुपये मिळाले, तो प्लेयर 7 महिन्यानंतर उचलणार बॅट, ‘या’ टीम विरुद्ध हल्लाबोल

| Updated on: Apr 24, 2023 | 2:34 PM

IPL 2023 : मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गोल्फ खेळताना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळेच तो टी 20 वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नाही. आता त्याच्या पुनरागमनाने टीमची ताकत वाढणार आहे.

IPL मध्ये 9.75 कोटी रुपये मिळाले, तो प्लेयर 7 महिन्यानंतर उचलणार बॅट, या टीम विरुद्ध हल्लाबोल
क्रिकेट खेळताना क्षुल्लक वादातून तरुणाला संपवले
Follow us on

IPL 2023 : प्रतिक्षा संपलीय. त्याच्या जखमा भरुन आल्यात. दुखापतीमुळे हा खेळाडू 7 महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. आता तो दुखापतीमधून सावरलाय. आयपीएलमध्ये 9.75 कोटी रुपये मिळूनही तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता तो आयपीएल 2023 मध्ये नाही, तर काऊंटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे.

आम्ही ज्या क्रिकेटरबद्दल बोलतोय, जो पुनरागमन करणार आहे, त्याचं नाव आहे, जॉनी बेयरस्टो. इंग्लंडच्या या विकेटकीपर बॅट्समनने दक्षिण आफ्रिके विरुद्ध मॅन्चेस्टर येथे शेवटची इनिंग खेळली होती. 26 ऑगस्ट 2022 ला तो शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आता 7 महिन्यानंतर तो नवीन इनिंग खेळण्यासाठी आतुर आहे.

कधी झालेली दुखापत?

जॉनी बेयरस्टोला मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गोल्फ खेळताना दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे तो मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप खेळू शकला नाही. इतकच नाही, पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या टेस्ट टीममधूनही तो बाहेर होता. यंदा आयपीएलमध्ये तो खेळत नाहीय. बॅक टू बॅक त्याला अनेक क्रिकेट सामन्यांवर पाणी सोडाव लागलय.


कुठल्या टीम विरुद्ध खेळणार?

बेयरस्टो आता दुखापतीमधून सावरलाय. त्याच्यासमोर Ashes सारखं मोठं आव्हान आहे. घरच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याआधी तो त्याच्या बॅटिंगवर काम करेल. म्हणूनच त्याने यॉर्कशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय.

प्रतिष्ठेच्या सीरीजमध्ये इंग्लंडचा पराभव

बेयरस्टो यॉर्कशायरच्या सेकंड स्ट्रिंग टीमकडून नॉटिंघमशायर विरुद्ध खेळेल. या सामन्याद्वारे आपला फिटनेस सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 टेस्ट मॅचची Ashes सीरीज 16 जूनपासून एजबेस्टनवर सुरु होणार आहे. Ashes सध्या ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात आहे. इंग्लंडने मागची Ashes सीरीज 0-4 ने गमावली होती.