IPL 2023 : आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील सामन्यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यातील पुन्हा एकदा वाद झालेला पाहायला मिळाला. कोहली आणि गंभीर पुन्हा भिडले. ज्यामुळे कोहलीला मोठा दंड ठोठावण्यात आला.
विराट कोहलीला 100% मॅच फी म्हणजेच 1.07 कोटी रुपये, तर गौतम गंभीरला 100% मॅच फी म्हणजेच 25 लाख रुपये आणि नवीन उल हकला 50% मॅच फी म्हणजेच 1.79 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. पण हे पूर्णपणे सत्य नाही. मॅच फीचा दंड खरा आहे, परंतु दिलेले आकडे खरे नाहीत. दुसरे म्हणजे, दंडाची रक्कम खेळाडूने नव्हे तर फ्रँचायझीने भरली आहे.
आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दोघांना मंगळवारी त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. लखनौचा सलामीवीर काइल मायर्सशी कोहलीसोबत झालेल्या वादामुळे भांडण सुरू झाले. लखनऊचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि कोहली हस्तांदोलन करत होते त्यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. आरसीबीच्या ग्लेन मॅक्सवेलने त्यांना वादापासून रोखले.त्यानंतर गंभीरने मायर्सला कोहलीशी बोलण्यापासून रोखले. काही वेळातच गंभीर कोहलीच्या दिशेने चालताना दिसला.
लखनऊचा कर्णधार केएल राहुलसह त्याच्या इतर खेळाडूंनी त्याला रोखले. यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी त्यांना लांब नेण्याचा प्रयत्न केला. गंभीर अधिक आक्रमक दिसत होता आणि लखनौच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने त्याला कोहलीच्या दिशेने पुढे जाण्यापासून वारंवार रोखले.