अहमदाबाद : अहमदाबाद येथे रंगलेल्या कालच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यानंतर आयपीएलच्या फायनलचं चित्र स्पष्ट झालं आहे. उद्या फायनलमध्ये गुजरात विरुद्ध चेन्नई संघ भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. उद्या रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सामन्याचा फिवरही वाढला आहे. उद्याच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्याच्यावर पैशांचा पाऊस होणार आहे. तर जो संघ हारेल त्यालाही करोडो रुपये मिळणार आहेत. प्रचंड बक्षिसांची लयलूट असलेला हा सामना म्हणूनच थरारक होणार असल्याचंही बोललं जात आहे.
उद्याच्या सामन्यात विजेता ठरणाऱ्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहे. तर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या मुंबई इंडियन्स आणि चौथ्या स्थानावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सलाही घसघशीत रक्कम मिळणार आहे. त्याशिवाय इतर पुरस्कारही दिले जाणार आहेत.
• विजेती टीम- 20 कोटी रुपये
• उप-विजेता संघ- 13 कोटी रुपये
• तिसऱ्या क्रमांकावरील संघ (मुंबई इंडियन्स)- 7 कोटी रुपये
• चौथ्या क्रमांकावरील संघ (लखनऊ सुपर जायंट्स)- 6.5 कोटी रुपये
• एमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट- 20 लाख रुपये
• सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन- 15 लाख रुपये
• ऑरेंज कॅप- 15 लाख रुपये (सर्वाधिक धावा)
• पर्पल कॅप- 15 लाख रुपये (सर्वाधिक विकेट)
• मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ऑफ द सीजन- 12 लाख रुपये
• सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम- 12 लाख रुपये
• गेम चेंजर ऑफ द सीजन- 12 लाख रुपये
आयपीएल 2023मध्ये प्लेऑफसह एकूण 74 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 70 मॅच लीग स्टेज होत्या. त्यात 18 डबल हेडरचा सहभाग होता. यावेळी गुवाहाटी आणि धर्मशाळेलाही मॅच आयोजित करण्याची संधी मिळाली. धर्मशाळा ही पंजाब किंग्स आणि गुवाहाटी हे राजस्थान रॉयल्सचं होमग्राऊंड होतं. याशिवाय अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि मुंबईतही सामने खेळवले गेले.
लीग सामने खेळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघ प्लेऑफमध्ये गेले होते. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स, सनराईजर्स हैदराबाद, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आदी संघाला प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळाली नव्हती.
• शुभमन गिल (गुजरात टायटन्स)- 851 धावा
• फाफ डु प्लेसिस (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)- 730 धावा
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)- 639 धावा
• डेवोन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)- 625 धावा
• यशस्वी जायसवाल (चेन्नई सुपर किंग्स)- 625 धावा
• मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)- 28 विकेट
• राशिद खान (गुजरात टायटन्स)- 27 विकेट
• मोहित शर्मा (गुजरात टायटन्स)- 24 विकेट
• पीयूष चावला (मुंबई इंडियन्स)- 22 विकेट
• युजवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)- 21 विकेट