अहमदाबाद : तुम्ही सच्चे क्रिकेट फॅन असाल, तर मॅचच्यावेळी पाऊस पडावा, अशी तुमची कधीही इच्छा नसेल, IPL फायनलची मॅच असेल, तर पाऊस पडूच नये, यासाठी तुम्ही प्रार्थना कराल. काल आयपीएल 2023 सीजनची फायनल मॅच खेळली जाणार होती. पण अचानक हवामान बदललं. धुवाधार पाऊस बरसला. टॉसही होऊ शकला नाही. परिणामी आज रिझर्व्ह डे च्या दिवशी आयपीएल फायनल मॅच होणार आहे. चेन्नई आणि गुजरातमध्ये आयपीएल फायनल सोमवारी होणार आहे. फक्त प्रश्न असा आहे की, अहमदाबादच हवामान कसं असेल?
अहमदाबादमध्ये हवामान अचानक बदलतय. रविवार सकाळपर्यंत तिथे पाऊस कोसळणार नाही, असं भाकीत वर्तवल जात होतं. पण मॅच सुरु होण्याआधी मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी म्हणजे आज आकाश स्वच्छ राहील, असं सांगितल जातय. अहमदाबादच्या प्रत्येक तासाच हवामान जाणून घ्या.
अहमदाबादमध्ये आज हवामान कधी बदलणार?
अहमदाबादमध्ये सोमवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत पाऊस कोसळणार नाही. पण हवामानाचा खेळ त्यानंतर बदलेल. वेदर डॉट कॉमच्या रिपोर्ट्नुसार, संध्याकाळी 4 पासून अहमदाबादच्या आकाशात ढगांची दाटी होईल. एक्यूवेदरच्या रिपोर्ट्नुसार, संध्याकाळी 5 वाजता अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
पाऊस कधी थांबणार?
वेदर रिपोर्ट्नुसार, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाऊस थांबेल. त्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता नाहीय. म्हणजे अहमदाबादमध्ये सोमवारी मॅचआधी पाऊस होईल पण जास्तवेळ पाऊस पडणार नाही. मॅच निर्धारित वेळेपेक्षा थोडी लेट सुरु होऊ शकते. हवामानाच्या रिपोर्ट्नुसार, गुजरात आणि चेन्नईमध्ये फायनल होणारच.
The Umpires are here with the latest update on the rain delay ?️
Hear what they have to say ? #TATAIPL | #CSKvGT | #Final pic.twitter.com/qG6LVj4uvh
— IndianPremierLeague (@IPL) May 28, 2023
कधीपर्यंत ओव्हर कपात होणार नाही?
रिझर्व्ह डे च्या दिवशी सुद्धा पावसामुळे मॅच होऊ शकली नाही, तर लीग स्टेजमधील टॉप टीमला विजेता म्हणून जाहीर केलं जाईल. हा सर्वात शेवटचा निर्णय असेल. पावसामुळे विलंब झालाच, तर रात्री 9.30 वाजेपर्यंत मॅच सुरु झाल्यास एकही ओव्हर कमी होणार नाही. पूर्ण 20 ओव्हर्सचा खेळ होईल. त्यानंतर मात्र ओव्हर कमी होऊ शकतात. गरज पडल्यास, सुपर ओव्हरमधूनही विजेत्याचा निर्णय होईल.