मुंबई | आयपीएल 16 व्या हंगामात सोमवारी 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळवण्यात आला. या लो स्कोअरिंग सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत 127 धावा डिफेंड केल्या. आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 रन्सचं टार्गेट दिलं होतं. मात्र आरसीबी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर लखनऊला हे आव्हान झेपलं नाही. लखनऊचा बाजार 19.5 ओव्हमध्ये 108 धावांवर आटोपला.
गोलंदाजांनी छोट्या धावसंख्येचा बचाव करणं हे आयपीएल स्पर्धेत तसं दुर्मिळच.कारण बहुतांश नियम हे बॅट्समनच्या बाजुने झुकणारे. गोलंदाजांचा पायाचा हिस्सा जरी रेषेच्या बाहेर गेला, तरी तो नो बॉल देण्यात येतो. मात्र फलंदाजांसाठी तसे कठोर नियम नाहीत. यामुळे गोलंदाजांनी छोट्या धावसंख्येचा बचाव करणं कौतुकास्पद ठरतं. मात्र गोलंदाजांचं कौतुक कुठे झालंच नाही, किंबहुना हा विषयच कुठे चर्चीला गेला नाही. त्याचं कारण म्हणजे लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक आणि आरसीबी बॅट्समन विराट कोहली यांच्यात दुसऱ्या डावातील 17 व्या ओव्हरमध्ये झालेली झकाझकी.
नवीन उल हक आणि विराट यांच्या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर सामन्याच्या निकालानंतर हे दोघे हस्तांदोलन करताना भिडले. यानंतर या दोघांच्या वादात लखनऊ सुपर जायंट्स टीमचा मेन्टॉर आणि विराट कोहली याचा वैरी असेलला गौतम गंभीर याने उडी घेतली. त्यानंतर नवीन उल हक राहिला बाजूलाच. गंभीर आणि विराट यांच्या दोघांमध्ये तुफान वाजलं. आता हे एकमेकांवर हात उगारतात की काय, असंच तो वाद पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं.
या सर्व प्रकारामुळे क्रिकेटची प्रतिमा डागाळली. यामुळे गंभीर आणि विराट या दोघांना एका सामन्याचं मानधनाची रक्कम दंड म्हणून द्यावी लागली. तर नवीन उल हक त्या तुलनेत स्वसतात सुटला. विराट आणि गंभीर 2013 नंतर पुन्हा भिडले. त्यामुळे या प्रकरणाला आणखी हवा मिळाली. दरम्यान या प्रकरणाच्या 2 दिवसांनी गौतम गंभीर याने ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केलीय. मात्र गंभीरने विराटच्या मुद्द्यावरुन नाव न घेता इंडिया टीव्ही या हिंदी वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक रजत शर्मा यांच्यावर निशाणा साधल्याचा दावा करण्यात येत आहे.
आता तुम्ही म्हणाल विराट आणि गंभीर वादात रजत शर्मा कुठून आले. तर विराट-गंभीर वादानंतर देशभरातील माध्यामांमध्ये विषय गाजला. याची दखल या हिंदी वृत्तवाहिनीने देखील घेतली. गंभीरच्या समर्थकांनुसार, या वृत्तात गंभीर विरोधात सर्व दाखवण्यात आलं. यावरुनच गंभीरने रजत शर्मा यांच्यावर टीकेची तोफ डागल्याचं म्हटलं जात आहे. रजत शर्मा यांनी केलेली ही टीका गंभीरला चांगलीच झोंबली. त्यानंतर गंभीरने रजत शर्मा यांचं नाव न घेता थेट ट्विट केलं.
Man who ran away from Delhi Cricket citing “pressure” seems over eager to sell paid PR as concern for cricket! यही कलयुग़ है जहां ‘भगोड़े’ अपनी ‘अदालत’ चलाते हैं।
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 3, 2023
“प्रेशर’बद्दल बोलून दिल्ली क्रिकेटमधून पळून गेलेला माणूस क्रिकेटची चिंता करण्याच्या नावाखाली पेड पीआर करण्यासाठी उत्सूक आहे. हे कलियुग आहे जिथे ‘पळपुटे’ ‘अदालत’ चालवतात”, असं गंभीरने ट्विटमध्ये म्हणत आता रजत शर्मा यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केलाय.
रजत शर्मा या वादावर बातम्यांदरम्यान निवदेन करत होते. या दरम्यान ते म्हणाले की, “माजी क्रिकेटर गौतम गंभीर निवडणूक लढवून खासदार झाले. त्यामुळे त्यांना आणखी प्रतिष्ठा मिळाली आहे. विराट कोहली याच्या लोकप्रियतेमुळे गौतम गंभीर याला असुया होते. विराटच्या लोकप्रियतेचा गंभीर याला त्रास होतो. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहली कायम आक्रमक असलेला खेळाडू आहे. विराट कोणतीही कृती सहन करत नाही. त्यामुळे विराटने गंभीरला तेव्हा जशास तसं उत्तर दिलं. मात्र गंभीर याला त्याने जे काही केलं ते एक माजी खेळाडू आणि खासदार म्हणून अशोभनीय आहे. अशा घटनांमुळे क्रिकेटची प्रतिमा खराब होते, असं व्हायला नको होतं”.
रजत शर्मा यांची गंभीरवर टीका
Rajat Sharma ?️"Gautam Gambhir is jelous of Virat Kohli's achievements. He's not able to digest the fact that Kohli is far better than him.''
Rajat ji owned Gambhir ??
Burnol moment for haters ??#ViratKohli? #ViratGambhirFight #gautamgambhir #RajatSharma pic.twitter.com/wjnAibtRDB
— Atom (@one8_07) May 3, 2023
आता गंभीर याने आपल्या ट्विटमध्ये अप्रत्यक्ष रजत शर्मा यांना “भगोडे अपनी ‘अदालत’ चलाते है, असं का म्हणाला याची पार्श्वभूमी जाणून घेऊयात. पहिली गोष्टी तर रजत शर्मा हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ‘आपकी अदालत’ या विशेष कार्यक्रमात दिग्गजांची मुलाखत घेतात. यावरुन गंभीरने निशाणा साधला. आता भगोडे का म्हणाला हे जरा सविस्तर जाणून घेऊयात.
रजा शर्मा यांनी जवळपास 20 महिने दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मात्र नोव्हेंबर 2019 मध्ये शर्मा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शर्मा यांनी राजीनामा देताना डीडीसीएतील वाद सर्वांसमोर मांडला.
“इथलं क्रिकेट प्रशासन हे दबाव आणि प्रचंड ओढाताणीने ग्रासलेले आहे. मला असं वाटतं की इथे क्रिकेट हिताविरोधात कट रचला जातो. इथे मला सत्य, निष्ठा, प्रामाणिकता आणि पारदर्शकतेसह सोबत पुढे वाटचालं करणं शक्य होणार नाही”, असं म्हणत शर्मा यांनी आपला राजीनामा दिला होता आणि अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे गंभीरने नाव न घेता शर्मा यांचा भगोडा असा उल्लेख केला. दरम्यान आता या प्रकरणात पुढे काय होतं, याकडे क्रिकेट विश्वाचं बारीक लक्ष असणार आहे.