अहमदाबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 179 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 178 धावा केल्या. चेन्नईकडून ऋुतुराज गायकवाड याने सर्वाधिक 92 धावांची खेळी केली. तर गुजरातकडून मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
ओपनर ऋतुराज गायकवाड याने केलेल्या खेळीमुळे चेन्नईला 200 पेक्षा अधिक धावा करण्याची संधी होती. त्यानुसार चेन्नईकडून गुजरातच्या गोलंदाजांचा कार्यक्रम सुरु होता. ऋतुराजने आधी 23 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर ऋतुराजने आणखी वेगाने टॉप गिअर टाकत फटकेबाजी केली. ऋतुराजाला शतक ठोकण्याची संधी होती. मात्र ऋतुराज 92 धावांवर आऊट झाला. ऋतुराज 50 बॉलमध्ये 4 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने या धावा केल्या.
चेन्नईकडून ऋतुराज व्यतिरिक्त मोईन अली याने 23, शिवम दुबे 19, महेंद्रसिंह धोनी 14*, अंबाती रायुडू, बेन स्टोक्स 7, तर रविंद्र जडेजा आणि डेव्हॉन कॉनवे या दोघांनी प्रत्येकी 1 धावा केली. तर मिचेल सँटनरने नॉट आऊट 1 धाव केली.
तर मोहम्मद शमी, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ या तिघांव्यतिरिक्त जोशुआ लिटील याने पदार्पणातील सामन्यात 1 विकेट घेत आश्वासक सुरुवात केली.
दरम्यान आता गुजरातच्या गोलंदाजांनी चेन्नईला मोठी धावसंख्या रोखण्यापासून रोखलं. आता त्यानंतर गुजरातच्या फलंदाजांवर विजयाची जबाबदारी आहे. गुजरातच्या ताफ्यात शुबमन गिल, ऋद्धीमान साहा, कॅप्टन हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि इतर फलंदाज आता कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरातला विजयासाठी 179 धावांचं आव्हान
Say hello to the 1⃣st-ever Impact Player in the history of the IPL! ?@TusharD_96 is ? the field, replacing Ambati Rayudu
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#TATAIPL | #GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/bkY7IF8Qpa
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
अहमदाबादमधील या स्टेडियममध्ये गेल्या 20 टी सामन्यांमध्ये 7 वेळा पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर विजयी आव्हानाचं पाठलाग करताना 13 वेळा विजय झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, दीपक चहर, मिचेल सँटनर आणि राजवर्धन हंगरगेकर
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, आर खान, मोहम्मद शमी, जोशवा लिटल, वाय दयाल आणि अल्जारी जोसेफ.