IPL 2023 News : आयपीएल 2023 चा निम्मा सीजन संपलाय. यंदाच्या सीजनमध्ये सुद्धा बॅट्समनच वर्चस्व दिसून येतय. काही सामन्यात गोलंदाजांची खूपच धुलाई झालीय. आयपीएलमध्ये गोलंदाजी करण सोपं नाहीय. एखाद्या सामन्यात मार बसल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं सोप नाहीय. फार कमी बॉलर छाप उमटवण्यात यशस्वी ठरलेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक नवख्या, कमी अनुभव असलेल्या बॉलर्सना फलंदाजांचा तडाखा सहन करावा लागतोय.
आयपीएलच्या 13 व्या सामन्यात असंच घडलं. त्यानंतर एका गोलंदाजाची तब्येत बिघडलीय. त्याच्या आरोग्यवर परिणाम झालाय.
अशक्यप्राय विजय मिळवून दिला
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये आयपीएलचा 13 वा सामना झाला. या मॅचमध्ये केकेआरच्या रिंकू सिंहने एक अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्याने गुजरात टायटन्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालच्या एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स मारले.
4 ओव्हरच्या स्पेलमध्ये किती धावा दिल्या?
यश दयालने त्याच्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 69 धावा दिल्या. एकही विकेट घेतला नाही. या सामन्यानंतर यश दयाल आयपीएलच्या एकाही सामन्यात गोलंदाजी करताना दिसलेला नाही. दरम्यान गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने यश दयाल संदर्भात एक मोठा खुलासा केलाय.
मानसिक धक्का बसला
काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. त्यात यश दयाल नव्हता. सामन्यानंतर हार्दिक पंड्याने यश दयाल आजारी असल्याच सांगितलं. त्याच वजन 8 ते 9 किलोने कमी झालय. “केकेआर विरुद्धच्या सामन्यानंतर यश दयाल मागच्या 10 दिवसांपासून आजारी आहे. त्याचं वजन 8 ते 9 किलोने कमी झालय. तो खूप मेहनत करतोय, लवकरच पुनरागमन करेल” असं हार्दिकने सांगितलं.
लास्ट ओव्हरमध्ये किती रन्स हवे होते?
9 एप्रिलला कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्स दरम्यान श्वास रोखून धरायला लावणारा रोमांचक सामना झाला. या मॅचमध्ये कोलकाताला लास्ट ओव्हरमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज होती. लास्ट ओव्हर यश दयाल टाकत होता. पहिल्या चेंडूवर उमेश यादवने सिंगल काढून यश दयालला स्ट्राइक दिला. रिंकूने त्यानंतर 5 सिक्स मारले. एका ओव्हरमध्ये 31 धावा लुटवल्या. यश दयाल गुजरातच्या पराभवाच कारण ठरला.