KL Rahul IPL 2023 : खराब खेळूनही केएल राहुलकडून स्वत:च्या बॅटिंगच समर्थन, म्हणाला….

| Updated on: Apr 11, 2023 | 4:08 PM

KL Rahul IPL 2023 : केएल राहुलचा फॉर्म हा लखनौ सुपर जायंट्स टीमसाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे. पण राहुलच स्वत:च्या फॉर्मबद्दल वेगळं मत आहे. स्वत:च्या खराब फॉर्मबद्दल KL Rahul च महत्वाच विधान.

KL Rahul IPL 2023 : खराब खेळूनही केएल राहुलकडून स्वत:च्या बॅटिंगच समर्थन, म्हणाला....
केएल राहुलवर कोणताच दबाव नाही? गौतम गंभीरनं माजी क्रिकेटपटूला सुनावले खडे बोल
Image Credit source: Twitter
Follow us on

RCB vs LSG IPL 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आता आयपीएल 2023 मध्ये सुद्धा केएल राहुलच खराब प्रदर्शन सुरु आहे. राहुलची बॅट चालत नाहीय. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात केएल राहुल 20 चेंडूत 18 धावांवर आऊट झाला. केएल राहुल लखनौ सुपर जायंट्स टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनने स्वत: चांगली कामगिरी करुन आदर्श घालून द्यायचा असतो. राहुलला सध्या ते जमत नाहीय. टीम इंडियात सुद्धा राहुलच स्थान सुरक्षित नाहीय.

बॉर्डर-गावस्कर सीरीज दरम्यान खराब फॉर्ममुळे केएल राहुलला टीमच्या उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. केएल राहुलचा फॉर्म हा लखनौ सुपर जायंट्स टीमसाठी सुद्धा चिंतेचा विषय आहे.

इनिंगला योग्य ठरवलं

लखनौ टीमकडून निकोलस पूरनने आयपीएलमधील दुसरं वेगवान अर्धशतक झळकावलं. त्याच दिवशी राहुलने 20 चेंडूत 18 धावा केल्या. महत्वाच म्हणजे राहुलने त्याच्या इनिंगला योग्य ठरवलं. वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने लखनौकडून खेळताना 19 चेंडूत 62 धावा केल्या. त्याने 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

राहुलची इनिंग पूर्णपणे वेगळी

लखनौ टीमने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धचा सामना शेवटच्या बॉलवर एक विकेटने जिंकला. पूरनच्या तुलनेत राहुलची इनिंग पूर्णपणे वेगळी होती. त्याने याआधी सुद्धा टी 20 क्रिकेटमध्ये धीमी फलंदाजी केलीय. सतत विकेट पडत असल्याने धीम्या गतीने फलंदाजी केल्याच राहुलने म्हटलय.

राहुलच स्वत:च्या बॅटिंगबद्दल काय मत?

“मी जास्त धावा केल्या असत्या, तर माझा स्ट्राइक रेट चांगला असता. मी परिस्थितीनुसार खेळलो. मला वाटतं, मी योग्य तेच केलं. एक-दोन चांगल्या इनिंगनंतर माझ्या स्ट्राइक रेट सुधारेल, अशी अपेक्षा आहे” असं केएल राहुल मॅचनंतर म्हणाला. राहुलच्या धीम्या बॅटिंगनंतर फलंदाजांवर दबावा वाढला. मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पूरनने आक्रमक बॅटिंग केली नसती, तर लखनौ टीमच्या अडचणी वाढल्या असत्या. राहुलने विजयाच श्रेय स्टॉयनिस आणि पूरनला दिलं.

‘इथे निकाल लास्ट बॉलवर लागतो’

“चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळून मी लहानाचा मोठा झालो. इथे निकाल लास्ट बॉलवर लागतो” असं केएल राहुल म्हणाला. “इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं नाही, हे मला माहित होतं. त्यांनी पावरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. आम्ही पूरन आणि स्टॉयनिसमुळे ही मॅच जिंकलोय” असं केएल राहुल म्हणाला.