लखनौ : आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना होणार आहे. चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात केएल राहुलच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स होता. हा सस्पेन्स आता संपुष्टात आलाय. केएल राहुल एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीय. त्याच्याजागी लखनौ सुपर जायंट्सचा दुसरा प्लेयर टीमच नेतृत्व करणार आहे.
क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलची इंजरी गंभीर आहे. आता तो या लीगमध्ये पुढे खेळणार की, नाही, याचा निर्णय BCCI घेणार आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीच्या मेडिकल टीमचा निर्णय यामध्ये महत्वाचा असणार आहे.
कधी झाली दुखापत?
केएल राहुलची दुखापत गंभीर आहे. पण सध्या तो टीमसोबतच आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आयपीएल 2023 चा 45 वा सामना खेळला जाणार आहे. राहुलला दुखापत झाली, तेव्हा तो, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात बाऊंड्री लाइनवर चेंडूचा पाठलाग करत होता.
केएल राहुलच्या जागी लखनौचा कॅप्टन कोण?
केएल राहुल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार नाही. त्याच्याजागी क्रृणाल पंड्याची लखनौ टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीय. राहुलने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध बॅटिंग केली होती. पण फिल्डिंग करताना, तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. त्यावेळी सुद्धा क्रृणालने टीमच नेतृत्व संभाळल होतं.
केएल राहुल WTC टीमचा भाग
केएल राहुलची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या टीममध्ये निवड झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये WTC फायनल होणार आहे. NCA ची मेडीकल टीम जो काही निर्णय घेईल, तो BCCI आणि LSG दोघांना बंधनकारक असेल.