मुंबई: T20 क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर्सना भरपूर मागणी आहे. ज्या टीमकडे ऑलराऊंडर्सची संख्या जास्त, तो मजबूत संघ समजला जातो. अलीकडेच टी 20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंडची टीम याचं एक चांगल उदहारण आहे. त्यांच्याकडे टीमला उपयुक्त ठरणारे ऑलराऊंडर्स आहेत. बॅट हाती घेतल्यानंतर धावा करणारा आणि चेंडू हाती घेतल्यानंतर विकेट काढणारा ऑलराऊंडर प्रत्येक टीमला हवा असतो. असाच एक ऑलराऊंडर आयपीएल 2023 च्या लिलावात दिसू शकतो. त्या खेळाडूच नाव आहे कॅमरुन ग्रीन.
आयपीएलसाठी लिलाव कधी?
ऑस्ट्रेलियाचा कॅमरुन ग्रीन आयपीएल 2023 साठीच्या लिलावात आपलं नाव नोंदवणार आहे. कोच्चीमध्ये 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव होणार आहे. स्पोर्टस्टारने आपल्या रिपोर्ट्मध्ये ही माहिती दिलीय. ऑस्ट्रेलियाचा हा ऑलराऊंडर चांगल्या खेळासाठी ओळखला जातो.
त्याच्यासाठी रंगणार स्पर्धा
ग्रीनला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये नक्कीच स्पर्धा असेल. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा लावला जाईल. काही फ्रेंचायजींना ग्रीन सारख्या खेळाडूंची गरज आहे. यात मुंबई इंडियन्स एक मोठ नाव आहे. मुंबईचा एका ऑलराऊंडर कायरन पोलार्डने कालच आयपीएलमधून निवृत्ती घेतली. मुंबईला त्याच्याजागी चांगल्या ऑलराऊंडरची गरज आहे. ग्रीनकडे पोलार्डची उणीव भरुन काढण्याची पूर्ण क्षमता आहे.
‘या’ टीम्सना सुद्धा त्याची गरज
लखनौने पण जेसन होल्डरला रिलीज केलय. ते सुद्धा ग्रीनला टीममध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. सनरायजर्सकडेही चांगला ऑलराऊंडर नाहीय. ते सुद्धा ग्रीनसाठी बोली लावतील, रिटेंशननंतर त्यांच्याकडे बराच पैसा शिल्लक आहे. चेन्नईने ड्वेन ब्राव्होला रिलीज केलय. ते सुद्धा शर्यतीत आहेत.
भारताविरुद्ध तुफान बॅटिंग
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियन टीम तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आली होती. ग्रीनने डावाची सुरुवात केली होती. त्याने तुफान खेळी केली होती. दोन अर्धशतकं फटकावली. मोहालीतील पहिल्या टी 20 सामन्यात 30 चेंडूत 61 धावा चोपल्या. त्यामुळे भारताला पराभवाचा धक्का बसला.