IPL 2023 : त्याच्यासमोर ती मुलगी….Rohit Sharma च्या सहकाऱ्याची लाजिरवाणी कृती, पहा VIDEO

| Updated on: May 01, 2023 | 11:29 AM

IPL 2023 : सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळलाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माणुसकी कुठे हरवली? असा प्रश्न पडतो.

IPL 2023 : त्याच्यासमोर ती मुलगी....Rohit Sharma च्या सहकाऱ्याची लाजिरवाणी कृती, पहा VIDEO
IPL 2023
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : सध्या जगभरातील क्रिकेट रसिक आयपीएल 2023 चा आनंद घेतायत. लोकप्रिय इंडिन प्रीमियर लीग स्पर्धेतील दुसरा टप्पा सुरु झालाय. आता कुठल्याही टीमला पराभव नकोय. प्रत्येक टीमला जिंकायच आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यागणिक आयपीएलचा रोमांच आणखी वाढत जाणार आहे. आयपीएल दरम्यान एक व्हिडिओ समोर आलाय, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

रोहित शर्माचा सहकारी या व्हिडिओमध्ये दिसतोय. हा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीमकडून खेळला आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या या खेळाडूने एक अशी कृती केली की, ज्यामुळे तो नेटीझन्सच्या रडारवर आला. त्याला भरपूर शिव्या पडतायत.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई इंडियन्सची टीम आता 8 पैकी 4 सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेला वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माचा 30 एप्रिलला रविवारी वाढदिवस होता. रोहितने वयाच्या 36 व्या वर्षात पदार्पण केलं.

नेमकं तिथे काय घडलं?

रोहितच्या वाढदिवशी मॅच असल्याने प्री-बर्थ डे सेलिब्रेशन करण्यात आलं. यासाठी एका पार्टीच आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी हजर होता. त्यावेळी घडलेल्या एका घटनेवरुन तो वादात अडकलाय.

धवल कुलकर्णी पार्टीसाठी एंट्री करत होता, त्यावेळी त्याच्यासमोरच एक महिला खाली पडली. धवलने त्या महिलेकडे पाहिलं. पण नंतर दुर्लक्ष केलं. फोटोशूटसाठी तिथेच थांबला व पार्टीसाठी आत निघून गेला.


कसं आहे धवल कुलकर्णीच करियर

धवल कुलकर्णी आयपीएल करियरमध्ये 92 सामने खेळलाय. त्याने 8.31 च्या इकॉनमीने 86 विकेट काढल्या. 14 रन्सवर 4 विकेट हा त्याचा बेस्ट स्पेल आहे. 2021 नंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसलेला नाही. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध वर्ष 2021 मध्ये तो शेवटचा सामना खेळला होता. मुंबई इंडियन्ससाठी त्याने ही मॅच खेळली होती.