लखनौ : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात सोमवारी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये सामना झाला. चालू सीजनमधील आयपीएलचा हा 43 वा सामना होता. ही मॅच जय-पराजयापेक्षा वादांमुळे जास्त गाजली. RCB चा प्रमुख खेळाडू विराट कोहली हा वादाच्या केंद्रस्थानी आहे. लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर, नवीन-उल-हक हे तिघे या सर्व प्रकरणात चर्चेत आहेत. दरम्यान आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपने आपलं डोकं बदललं आहे. पर्पल कॅप मात्र त्याच खेळाडूकडे कायम आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. आयपीएल सीजन जसजसा पुढे सरकतो, तसं ऑरेंज आणि पर्पल कॅप आपलं डोकं बदलत असते.
आरसीबी बॉलर्सची सरस कामगिरी
काल लखनौ विरुद्ध बँगलोर सामन्यात विराट कोहलीच्या RCB ने केएल राहुलच्या लखनौवर 18 धावांनी विजय मिळवला. आरसीबीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 126 धावा केल्या. लखनौ समोर विजयासाठी सोपं 127 धावांच टार्गेट होतं. पण आरसीबी बॉलर्सच्या सरस कामगिरीमुळे लखौनच्या फलंदाजांना हे लक्ष्य पेलवलं नाही. त्याचा डाव 108 धावात आटोपला.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप 5 कोण?
दरम्यान या सामन्यात 40 चेंडूत 44 धावांची खेळी करणारा RCB चा कॅप्टन फाफ डु प्लेसीसने ऑरेंज कॅप मिळवली आहे. टुर्नामेंटमध्ये त्याच्या एकूण 466 धावा झाल्या आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप यशस्वी जैस्वालकडे होती. तो आता दुसऱ्या स्थानावर आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेले टॉप 5 खेळाडू जाणून घेऊया.
टीमचं नाव | फलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण धावा | हायस्कोअर |
---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | शुबमन गिल | 17 | 890 | 129 |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसिस | 14 | 730 | 84 |
चेन्नई सुपर किंग्स | डेव्हॉन कॉनव्हे | 16 | 672 | 92* |
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | विराट कोहली | 14 | 639 | 101* |
राजस्थान रॉयल्स | यशस्वी जयस्वाल | 14 | 625 | 124 |
सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. या शर्यतीत CSK चा गोलंदाज टॉपवर कायम आहे. पण मोहम्मद सिराज तिसऱ्यावरुन दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |