Mumbai Indians News : IPL 2023 ची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध होणार आहे. 2 एप्रिलला पहिली मॅच होईल. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावलं आहे. IPL 2023 मध्ये सर्वात जास्त चर्चा मुंबई इंडियन्सच्या टीमची आहे. मुंबईच्या टीममध्ये एक फ्लॉप खेळाडू सुद्धा आहे. आयपीएलमध्ये हा फ्लॉप खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी मोठा विलन ठरु शकतो.
IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने या खेळाडूला टीममध्ये ठेऊन कदाचित आपल्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. हा खेळाडू मुंबई इंडियन्सच्या पराभवाला कारण ठरु शकतो. हा प्लेयर पीयूष चावला आहे. यंदाच्या सीजनमध्ये सर्व टीम्सच्या तुलनेत मुंबई इंडियन्स स्पिन बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये कमकुवत आहे. मुंबई इंडियन्सकडे अनुभवी फिरकी गोलंदाज म्हणून पीयूष चावला आहे.
ठरु शकतो सर्वात मोठा विलन
आयपीएल 2023 मध्ये पीयूष चावला मुंबई इंडियन्स टीमसाठी सर्वात मोठा विलन ठरु शकतो. पीयूष चावलाबद्दल बोलायच झाल्यास, त्याने वर्ष 2021 नंतर आयपीएल सामना खेळलेला नाही. पीयूष चावला चेन्नई सुपर किंग्ससाठी 2021 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर 2022 साली पीयूष चावलला मुंबई इंडियन्स टीमने विकत घेतलं. पण त्याला संधी मिळाली नाही. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमद्ये पोहोचू शकली नाही. कारण त्यांच्याकडे चांगल्या स्पिनरची कमतरता होती.
IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सची टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, टिम डेविड, मोहम्मद अरशद खान, रमनदीप सिंह, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, कॅमरून ग्रीन, झाए रिचर्डसन, पीयूष चावला, डुआन जॉनसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वढेरा, राघव गोयल.