IPL 2023 Playoff Scenario : IPL 2023 चा निम्मा सीजन पूर्ण झालाय. एकूण 70 पैकी 35 सामने खेळून पूर्ण झालेत. ग्रुप स्टेजमध्ये एकूण 14 सामने खेळले जाणार आहेत. त्यात 10 टीम्सचे निम्मे सामने बाकी आहेत. म्हणजे 7 सामने खेळून पूर्ण झालेत. अशावेळी पॉइंट्स टेबलवर एक नजर मारा. प्लेऑफच्या शर्यतीत कुठली टीम कुठल्या स्थानावर आहे, ते पॉइंट्स टेबलमधून समजेल.
प्लेऑफसाठी कुठल्या टीमची दावेदारी मजबूत आहे? कुठली टीम मागे पडतेय? काय करण्याची गरज आहे? ते लक्षात येईल.
अशी आहे स्थिती?
IPL 2023 च्या निम्म्या प्रवासात पॉइंट्स टेबलमध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सची टीम टॉपवर आहे. त्यानंतर हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स दुसऱ्या नंबरवर आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स टॉप 4 मध्ये कायम आहेत.
प्रत्येक 5 मॅच जिंकणाऱ्या दोन टीम कुठल्या?
पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये असलेलल्या टीम्स IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचतील. म्हणजे सध्या चेन्नई, गुजरात, राजस्थान आणि लखनौ सर्वात पुढे आहे. चेन्नई आणि गुजरातने 7 पैकी प्रत्येकी 5-5 मॅचेस जिंकल्यात. त्यांचे 10 पॉइंट्स आहेत. रनरेट चांगला असल्यामुळे CSK पहिल्या स्थानावर आहे. GT दुसऱ्या नंबरवर आहे.
समान पॉइंट् असूनही एक पाऊल पुढे
राजस्थान आणि लखनौची टीम तिसऱ्या, चौथ्या नंबरवर आहे. दोन्ही टीम्सनी आतापर्यंत 7 पैकी प्रत्येकी 4 सामने जिंकलेत. त्यांचे 8 पॉइंट्स आहेत. चांगल्या रनरेटमुळे LSG पेक्षा RR एक पाऊल पुढे आहे.
बँगलोर, पंजाब मागे नाही
IPL 2023 च्या पॉइंट्स टेबलमध्ये RCB आणि पंजाब किंग्सची टीम 5 व्या व 6 व्या नंबरवर आहे. दोघांचे 8-8 पॉइंट्स आहेत. या दोन टीम्सनी सुद्धा 7 पैकी प्रत्येकी 4-4 सामने जिंकलेत. रनरेटमुळे फक्त पोजिशनमध्ये फरक आहे.
संघ | मॅच | विजय | पराभव | गुण | एनआरआर |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | +0.820 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.652 |
लखनऊ सुपर जायंट्स | 14 | 8 | 5 | 17 | +0.284 |
मुंबई इंडियन्स | 14 | 8 | 6 | 16 | -0.044 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 7 | 7 | 14 | +0.148 |
आरसीबी | 13 | 7 | 6 | 14 | -0.128 |
केकेआर | 14 | 6 | 8 | 12 | -0.229 |
पंजाब किंग्स | 14 | 6 | 8 | 12 | -0.304 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 5 | 9 | 10 | -0.808 |
सनरायजर्स हैदराबाद | 13 | 4 | 9 | 08 | -0.558 |
मुंबई इंडियन्सची टीम या सीजनमध्ये निराशाजनक प्रदर्शन करतेय. पॉइंट्स टेबलवर त्याचा परिणाम दिसून येतोय. 7 पैकी फक्त 3 सामने जिंकून ही टीम 7 व्या नंबरवर आहे. मुंबई इंडियन्सची टीम आता भले खाली दिसतेय, पण त्यांच्याकडे अजून 7 सामने बाकी आहेत. उर्वरित सीजनमध्ये प्रदर्शनाचा स्तर उंचावला, तर मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये दिसेल.
कोलकाता, हैदराबाद आणि दिल्लीची टीम प्रत्येकी 4 पॉइंट्ससह 8 व्या, 9 व्या आणि 10 व्या नंबरवर आहे. त्यांच्यामध्ये रनरेटच अंतर आहे.