नवी दिल्ली : IPL 2023 मध्ये पुढचे चार दिवस खूप महत्वाचे आहेत. या चार दिवसात प्लेऑफचा सीन क्लियर होईल. धोनी, विराट आणि रोहित पुढे जाणार की, कोणी प्लेऑफच्या शर्यतीत मागे पडणार? ते चित्र या चार दिवसात स्पष्ट होईल. या चार दिवसात तीन टीम्सची नशीब हरलेले खेळाडू ठरवतील. काल म्हणजे 17 मे पासून याची सुरुवात झाली आहे.
आता तुम्ही विचार करत असाल, हरलेल्या खेळाडूंचा तीन टीम्सच्या नशिबाची काय संबंध? सर्वप्रथम तुम्ही हे लक्षात घ्या, हरलेल्या खेळाडूंचा अर्थ इथे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेल्या दोन टीम्सशी आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे ते दोन संघ आहेत.
हरलेले खेळाडू ठरवणार 3 टीम्सच नशीब
आता या हरलेल्या दोन टीम्स प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या तीन टीम्सचं नशीब ठरवतील. यात एक रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दुसरी चेन्नई सुपर किंग्स आणि तिसरी मुंबई इंडियन्स आहे. या तिन्ही टीम्सना आता उर्वरित सामन्यांपेकी एक सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध खेळायच आहे.
RCB समोर SRH च आव्हान
IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमचे ग्रुप स्टेजमधील 2 सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना दोन मॅच जिंकाव्याच लागतील. त्यांचा पुढचा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आहे. काही तासांनी हैदराबादमध्ये हा सामना होईल. हा सामना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेलेल्या SRH ने जिंकला, तर प्लेऑफमध्ये दाखल होण्याच्या RCB च्या मार्गात अडथळे निर्माण होतील.
CSK समोर DC च चॅलेंज
एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ससमोर दिल्ली कॅपिटल्सच आव्हान असेल. दिल्ली कॅपिटल्सची टीम प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वप्रथम बाहेर गेली. IPL 2023 च्या सीजनचा शेवट विजयाने करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. CSK ला प्लेऑफची ट्रेन पकडण्यासाठी दिल्लीवर विजय आवश्यक आहे. दोन्ही टीम्सचे आपआपले उद्देश आहेत. यश कोणाला मिळणार? हे 20 मे रोजी ठरेल.
मुंबई इंडियन्सकडे शेवटची संधी
विराट आणि धोनी नंतर रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स सुद्धा प्लेऑफच्या शर्यतीत आहे. लखनऊ विरुद्ध सामना गमावल्यामुळे मुंबई इंडियन्सच प्लेऑफच समीकरण बिघडलं आहे. आता आणखी काही गोष्टी बिघडू नयेत, यासाठी मुंबई इंडियन्सला काहीही करुन सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवावा लागेल. 21 मे रोजी हा सामना होणार आहे.