बंगळुरु : IPL 2023 मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये मॅच झाली. RCB ने हा सामना 21 रन्सनी गमावला. या मॅचमध्ये 20 लाख बेस प्राइस असलेल्या एका वेगवान गोलंदाजाने आपल्या बॉलिंगने फॅन्सच मन जिंकलं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमला जसप्रीत बुमराहसारखा घातक यॉर्कर टाकणारा गोलंदाज मिळालाय.
या वेगवान गोलंदाजाला RCB ने फक्त 20 लाख रुपयामध्ये विकत घेतलं होतं. पण या गोलंदाजाने काही कोटी रुपये घेणाऱ्या खेळाडूसारखी कामगिरी केलीय.
घातक गोलंदाजीच प्रदर्शन
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमचा वेगवान गोलंदाज विजय कुमार वैशक कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध बुधवारी सामना खेळला. यावेळी त्याने आपल्या घातक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. 26 वर्षाच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या घातक यॉर्कसनी अनेकांना आपल फॅन बनवलं. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध कुमार वैशकने 2 विकेट काढल्या.
बुमराहसारखा घातक यॉर्कर
केकेआर विरुद्ध विजय कुमार वैशकने टाकलेल्या एका चेंडूची खूप चर्चा आहे. त्या चेंडूवर त्याने इंग्लंडचा स्फोटक ओपनर जेसन रॉयला क्लीन बोल्ड केलं. केकेआर इनिंगच्या 10 व्या ओव्हरमध्ये वैशकने जसप्रीत बुमराहसारखा घातक यॉर्कर टाकून जेसन रॉयला क्लीन बोल्ड केलं. विजय कुमार वैशकचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.
जसप्रीत बुमराहची झलक
विजय कुमारने याआधी कोलकाता नाइट रायडर्सच्या इनिंगमध्ये 9 व्या ओव्हरमध्ये नारायण जगदीशनला आऊट केलं. विजय कुमारच्या वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची झलक पहायला मिळतेय. जसप्रीत बुमराहसारखा वैशक आपल्या अचूक यॉर्करने प्रतिस्पर्धी संघाला धक्का देतोय.
RCB ला किती रन्सनी हरवलं ?
कालच्या मॅचमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमवर मात केली. केकेआरने RCB ला 21 धावांनी हरवलं. कोलकाता नाइट रायडर्सने विजयासाठी 201 धावांच लक्ष्य दिलं होतं. आरसीबीकडून कॅप्टन विराट कोहलीने (37 चेंडूत 54 धावा) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 8 विकेटवर 179 धावा केल्या.