मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला कोलकात्याकडून पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. स्पर्धेतील पहिला सामना कोलकात्या विरुद्ध 81 धावांनी गमावला होता. आता पुन्हा एकदा दुसरा सामना धावांनी गमावला आहे. पण दुसऱ्या सामन्यात दोन चुका चांगल्याच महागात पडल्या. बंगळुरुच्या खेळाडूंनी नितीश राणावर अक्षरश: मेहरबानी केली असंच म्हणावं लागेल. त्यामुळे नितीश राणाची मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. कर्णधार नितीश राणाने 21 चेंडूत 48 धावांची खेळी केली.
कोलकात्याने 10 षटकात दोन गडी गमावले होते आणि नितीश राणा मैदानात आला होता. केकेआरला कर्णधार नितीश राणाकडून आशा होती. पण या आशेवर पाणी फेरलं असतं जर मोहम्मद सिराजने झेल घेतला असता. पण झालं असं की पहिलं जीवदान सिराजने दिले. विजय वैशाकच्या गोलंदाजीवर लाँग ऑनवर मोहम्मद सोपा झेल सोडला. त्यावेळी नितीश राणाने 5 चेंडूत 5 धावा केल्या होत्या.
Siraj dropping catch in #RCBvsKKR we have seen it before. pic.twitter.com/6JLC4nQZFe
— Rowan (@Akhil39888074) April 26, 2023
मोहम्मद सिराजने केलेली चूक पुन्हा एकदा हर्षल पटेलने केली आहे. सिराजच्या गोलंदाजीवर डीप स्क्वेअर लेगवर हर्षल पटेलने झेल सोडला. यावेळी नितीश राणा फक्त 19 धावांवर होता.
नितीश राणाने दोन जीवदान मिळाल्यानंतर आक्रमक खेळी केली. हर्षल पटेलला सलग तीन चौकार ठोकले. पण अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. पण पहिला झेल सोडल्यानंतर पुढच्या 16 चेंडूत 43 धावा केल्या त्यामुळे बंगळुरुचं नुकसान झालं.
Nitish is scoring Run Rana Run ?@KKRiders' skipper goes ? back-to-back ?#RCBvKKR #TATAIPL #IPLonJioCinema #IPL2023 pic.twitter.com/I3fNVedeSr
— JioCinema (@JioCinema) April 26, 2023
कोलकात्याकडून जेसन रॉय आणि नारायण जगदीसन ही जोडी मैदानाता उतरली. पहिल्या षटकात दोन चौकर ठोकत जेसन रॉयने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात शाहबाज अहमदला तीन सलग षटकार ठोकले. त्यानंतर एक चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकत कोलकात्याची गाडी रुळावर आणली. जेसन रॉयने 22 चेंडूत 50 धावा केल्या.
नारायण जगदीसनच्या रुपाने कोलकात्याला पहिला धक्का बसला. वैशाक विजय कुमारच्या गोलंदाजीवर 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर जेसन रॉयही त्याच्या गोलंदाजीवर बाद झालाय त्याने 29 चेंडूत 56 धावांची खेळी केली. त्याने 5 षटकार आणि 4 चौकार ठोकले.
त्यानंतर नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी डाव सावरला. तिसऱ्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर शेवटच्या षटकात फटकेबाजी करताना नितीश राणा बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर 31 धावा करून बाद झाला.
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजी आंद्रे रसेल त्रिफळाचीत झाला. तो फक्त 2 चेंडू खेळत तंबूत परतला. रिंकु सिंह 18 आणि डेविड विस 12 या धावांवर नाबाद राहिले.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): एन जगदीसन (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, डेव्हिड विसे, वैभव अरोरा, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), शाहबाज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, विजयकुमार विशक, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.