GT vs MI IPL 2023 : IPL 2023 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स टीमचा चार सामन्यात पराभव झालाय. 10 टीम्स खेळत असलेल्या या स्पर्धेत 6 पॉइंट्ससह मुंबई इंडियन्सची टीम 7 व्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सची टीम चालू सीजनमध्ये 7 पैकी फक्त 3 सामने जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. रोहित शर्माच घातक अस्त्रच टीमसाठी आता ओझ बनलाय. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्सची नौका बुडतेय.
या खेळाडूच्या फ्लॉप प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये एकापाठोपाठ एक पराभवाचा सामना करावा लागतोय. मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी एक खेळाडू विलन ठरतोय.
त्याच्या खराब कामगिरीचा मुंबईला फटका
आयपीएल 2023 मध्ये या प्लेयरच्या सुमार फलंदाजीचा फटका मुंबई इंडियन्सला बसतोय. ओपनर इशान किशनच्या फ्लॉप शो ची मुंबई इंडियन्सला किंमत चुकवावी लागतेय. इशान किशनच्या खराब प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्सला दमदार ओपनिंग मिळत नाहीय.
संकटात सोडून निघून गेला
इशान किशन मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात फ्लॉप ठरला. गुजरात टायटन्स विरुद्ध इशान किशनकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण इशान टीमला संकटात सोडून निघून गेला. या मॅचमध्ये गुजरातने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 207 ही विशाल धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्ससमोर 208 धावांच टार्गेट होतं.
लाजिरवाणा पराभव
इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा ओपनर इशान किशनकडून एका मोठ्या इनिंगची अपेक्षा होती. पण तो फक्त 13 रन्स काढून आऊट झाला. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 55 धावांनी विजय मिळवला. मुंबईला एका लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
किंमतीसारख प्रदर्शन नाही
इशान किशनला मुंबई इंडियन्सने आय़पीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये 15.25 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं होतं. पण तो त्या किंमतीला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. इशान किशनच्या आधी मुंबई इंडियन्ससाठी क्विंटन डि कॉक रोहित शर्मासोबत ओपनिंगला यायचा. त्यावेळी टीमची आक्रमक सुरुवात विरोधी टीमवर धाक निर्माण करायची.
चालू सीजनमध्ये किती धावा केल्या?
आयपीएल 2022 च्या लिलावात क्विंटन डि कॉकला लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतलं. मुंबई इंडियन्सच यामुळे मोठं नुकसान झालं. इशान किशनने आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये 7 सामन्यात 26.14 च्या खराब सरासरीने आतापर्यंत फक्त 183 धावा केल्या आहेत.