IPL 2023 : शुभमनच्या स्थानाला धोका, आयपीएलमध्ये ‘तो’ धुमाकूळ घालतोय, WC मध्ये बून शकतो रोहितचा ओपनिग पार्ट्नर

| Updated on: Apr 10, 2023 | 11:34 AM

IPL 2023 : त्याचा फॉर्म शुभमन गिलसाठी धोक्याची घंटा आहे. रोहित शर्मासोबत तो वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये ओपनिंग पार्ट्नर म्हणून उतरु शकतो. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघतायत.

IPL 2023 : शुभमनच्या स्थानाला धोका, आयपीएलमध्ये तो धुमाकूळ घालतोय, WC मध्ये बून शकतो रोहितचा ओपनिग पार्ट्नर
Shubhaman Gill
Image Credit source: PTI
Follow us on

IPL 2023 News : IPL 2023 मध्ये एक फलंदाज आपल्या बॅटने भल्या-भल्या गोलंदाजांची दाणादाण उडवतोय. त्याच्या जबरदस्त बॅटिंगने सिलेक्टर्सची झोप उडवून दिलीय. खोऱ्याने धावा काढणाऱ्या या बॅट्समनने वर्ल्ड कप 2023 साठीचा आपला दाव मजबूत केलाय. तो वर्ल्ड कप 2023 मध्ये कॅप्टन रोहित शर्माचा ओपनिंग पार्ट्नर बनू शकतो. वर्ल्ड कप 2023 मध्ये त्याची बॅट चालली, तर स्वबळावर तो प्रतिस्पर्धी टीमसाठी घातक ठरु शकतो. टीम इंडियाचा हा खेळाडू वर्ल्ड कप 2023 गाजवू शकतो.

IPL 2023 मध्ये त्याची बॅट आग ओकत आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्या तीन सामन्यात त्याने 40, नाबाद 86 आणि नाबाद 99 धावा फटकावल्या आहेत.

3 मॅचमध्ये त्याने किती धावा केल्या?

शिखर धवनने 3 मॅचमध्ये एकूण 255 धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. शिखर धवनने आपल्या दमदार फॉर्मच्या बळावर वर्ल्ड कप 2023 च्या सिलेक्शनसाठी दावा ठोकलाय. शिखर धवन भारतीय क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ नावाने ओळखला जातो. तो क्रीजवर उतरतो, तेव्हा आपल्या तुफानी बॅटिंगने प्रतिस्पर्धी टीमच्या अडचणी वाढवतो. वनडे क्रिकेटमध्ये धवनच्या टॅलेंटचा प्रश्नच नाही.

टीम इंडियात काय बदल होतील?

शिखर धवन आयपीएलच्या आधी टीम इंडियाच्या वनडे संघाबाहेर होता. पण त्याचा करंट फॉर्म लक्षात घेता, तो वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये कॅप्टन रोहित शर्माचा ओपनिंग पार्ट्नर असू शकतो. धवनकडे अनुभवाची कमतरता नाहीय. त्याची आणि रोहितची जोडी टीमसाठी चांगली बॅलन्स ठरेल. शिखर धवन आणि रोहित शर्मा ओपनिंगला आल्यास शुभमन गिलच्या स्थानाला धोका निर्माण होऊ शकतो. सध्या तो रोहितचा ओपनिंग पार्ट्नर आहे. केएल राहुल 5 व्या नंबरवर फलंदाजीसाठी येणार आहे.

टेस्ट, वनडे आणि टी 20 मध्ये किती धावा?

रोहित सोबत शिखर धवनने जगातील प्रत्येक मैदानात धावा केल्या आहेत. मोठ्यात मोठा गोलंदाज दोघांना गोलंदाजी करताना टेन्शनमध्ये येतो. 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कॅप्टन एमएस धोनीने धवन-रोहितची जोडी सलामीला पाठवली होती. तेव्हापासून या दोघांची ओपनिंग जोडी फिक्स झाली. दोघांनी टॉप ऑर्डरमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. शिखर धवनने टीम इंडियासाठी 34 टेस्ट मॅचमध्ये 2315 धावा, 167 वनडे मॅचमध्ये 6793 धावा आणि 68 टी 20 सामन्यात 1759 धावा केल्या आहेत.