हैदराबाद : मैत्री खूप सुंदर नातं आहे. त्यात मैत्री बालपणीची असेल, तर विचारायलाच नको, त्या मैत्रीची आपलीच एक वेगळी मजा असते. काल मैदानावर खेळताना शुभमन गिल आपली बालपणीची मैत्री विसरला. फक्त दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे, म्हणून शुभमनला मैत्रीचा विसर पडला. आता तुम्ही विचार करत असाल, बालपणीची मैत्री आणि शुभमन गिलचा शब्द याचा काय संबंध आहे?. कनेक्शन थेट नाहीय, मात्र आयुष्याचा एक भाग नक्की आहे.
शुभमन गिलने शतक झळकवण्याच आश्वासन दिलं होतं. तो शब्द त्याने काल पूर्ण केला. या शतकाच्या नादात शुभमन समोर बालपणीचा मित्र होता. शुभमनने त्याला अजिबात दया-माया दाखवली नाही. त्याचे चेंडू थेट प्रेक्षक स्टँडमध्ये पाठवले.
बालपणीची मैत्री विसरला
अभिषेक शर्मा हा शुभमन गिलचा बालपणीचा मित्र आहे. T20 क्रिकेटमध्ये अभिषेक शुभमनसोबत ओपनिंगला येतो. शुभमन गिलने मॅचनंतर प्रेजेंटेशनच्यावेळी बोलताना सांगितलं, “मी अभिषेकला बोललो होतो, तू बॉलिंगला आलास, तर मी तुला सिक्स मारेन. जेव्हा तो गोलंदाजीला आला, तेव्हा मी असच केलं”
7 मे रोजी दिलेला शब्द 15 मे ला पूर्ण केला
गुजरात टायटन्सकडून खेळणारा शुभमन गिल एका मिशनवर आहे. शब्द पूर्ण करण्याचा आवेश त्याच्यात आहे. त्याने 7 मे रोजी शब्द दिलेला, ते आश्वासन त्याने 15 मे रोजी पूर्ण केलं.
शतक पूर्ण न झाल्याची खंत आहे का?
7 मे रोजी शुभमन गिल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 94 रन्सवर नाबाद होता. त्यावेळी शतक पूर्ण न झाल्याची खंत आहे का? असा प्रश्न त्याला विचारला होता. त्यावर अजिबात नाही, असं गिलने उत्तर दिलेलं. अजून 5-6 सामने बाकी आहेत, त्यात शतक झळकवण्याचा प्रयत्न करीन असं तो बोलला होता.
लखनौ विरुद्ध मॅच संपल्यानंतर शुभमन गिल जे बोलला होता, ते त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पूर्ण केलं. महत्वाच म्हणजे त्याचं हे पहिलं आयपीएल शतक आहे. ज्या टीम विरुद्ध त्याने आयपीएलमध्ये डेब्यु केलेला त्याच टीम विरुद्ध शुभमनने शतक झळकावलं.
12 व्या ओव्हरमध्ये विसरला मैत्री, 17 व्या षटकात सेंच्युरी
शुभमन गिलने 12 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर बालपणीचा मित्र आणि SRH कडून खेळणाऱ्या अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर सिक्स मारला. 17 व्या ओव्हरमध्ये त्याने SRH विरुद्ध सेंच्युरी झळकवली.