Delhi Capitals IPL 2023 : IPL चा 16 वा सीजन या महिन्यापासून सुरु होणार आहे. 31 मार्चला पहिला सामना होणार आहे. सीजन सुरु होण्याधीच दिल्ली कॅपिटल्स टीमच्या अडचणी वाढताना दिसतायत. मागच्या सीजनमध्ये ऋषभ पंतकडे टीमच नेतृत्व होतं. पण मागच्यावर्षाच्या अखेरीस ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला. त्यामुळे यंदाच्या सीजनमध्ये तो खेळणार नाहीय. या दरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या एका मोठ्या मॅचविनर खेळाडूला दुखापत झालीय. हा खेळाडू आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो.
मेडिकल टीमने काय सांगितलय?
सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरीज सुरु आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाला दुखापत झालीय. तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. या दुखापतीमुळे तो वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल टीमने खबरदारी म्हणून नॉर्खियाल विश्रांती घ्यायला सांगितली आहे. एनरिक नॉर्खिया दुखापतीमधून सावरला नाही, तर दिल्ली कॅपिटल्सच टेन्शन वाढू शकतं.
दुसरा पर्याय काय?
प्रोटियाजचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाला पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला टेस्ट टीममधून वगळण्यात आलं, असं CSA ने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. 29 वर्षाच्या नॉर्खियाने सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 5/36 आणि 1/48 विकेट घेतला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 87 धावांनी विजय मिळवला.