IPL 2023 RCB News : आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन डिसेंबरमध्ये झालं. त्यावेळी एका प्लेयरवर कोणी बोली लावली नाही. आता त्या प्लेयरला अचानक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये स्थान मिळालय. आरसीबीच्या टीममधून रीस टॉप्ली बाहेर गेलाय. त्याच्याजागी या खेळाडूची निवड करण्यात आलीय. रीस टॉप्लीला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्याचा खांदा दुखावला होता. आता रीस टॉप्लीच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाची RCB टीममध्ये एंट्री झालीय.
आरसीबी टीमचा गुरुवारी रात्री कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सामन्यात पराभव झाला. आज दक्षिण आफ्रिकेच्या वेन पार्नेलची टीममध्ये निवड झालीय. रीस टॉप्लीच्या जागी तो खेळणार आहे.
कोण आहे वेन पार्नेल?
वेन पार्नेल दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. हा खेळाडू व्हाइट बॉल क्रिकेटचा स्पेशलिस्ट मानला जातो. पार्नेलने 73 वनडे मॅचेसमध्ये 99 विकेट काढलेत. टी 20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्या नावावर 59 विकेट आहेत. पार्नेल आपल्या करियरमध्ये एकूण 257 टी 20 सामने खेळलाय. यात त्याने 259 विकेट घेतल्या आहेत. वेन पार्नेल 2017 साली दक्षिण आफ्रिका सोडून इंग्लंडला गेला.
कोलपॅक डील
पार्नेलने कोलपॅक डील साइन केली होती. त्यासाठी त्याने वयाच्या 26 व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. 2021 मध्ये हा खेळाडू परत आला. पार्नेल आता दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि टी 20 टीमचा भाग आहे.
धर्म परिवर्तन करुन इस्लाम स्वीकारला
वेन पार्नेलने आपला धर्म बदललाय. पार्नेलने वयाच्या 22 व्या वर्षी आपल्या वाढिदवशी धर्म परिवर्तन केलं. पार्नेल इस्लाम धर्म स्वीकारला. वर्ष 2016 मध्ये पार्नेलने मॉडेल आएशा बाकर बरोबर लग्न केलं. दोघांनी मशिदीत निकाह केलं. पार्नेलसोबत RCB च्या टीममध्ये वैशाख विजय कुमारची सुद्धा एंट्री झालीय. त्याचा रजत पाटीदारच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलाय. विजय कुमार वेगवान गोलंदाज आहे.