हैदराबाद : सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये आयपीएलमधला 58 वा सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये ही मॅच होईल. SRH ने आतापर्यत 10 सामने खेळले असून त्यांनी चार मॅचमध्ये विजय मिळवलाय. प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही SRH ची टीम आहे. पुढचे सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. अलीकडेच त्यांनी राजस्थान रॉयल्सवर चार विकेटने विजय मिळवला होता. शेवटच्या चेंडूवर त्यांनी 215 धावांच टार्गेट चेस केलं होतं.
लखनौ सुपर जायंट्सने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये ते पाचव्या स्थानावर आहेत. अलीकडेच गुजरात टायटन्सने त्यांचा 56 धावांनी पराभव केला होता. गुजरातने पहिली बॅटिंग करताना 227 धावांचा डोंगर उभारला. लखनौच्या टीमला 171 धावापर्यंत मजला मारता आली होती.
विजय दोन्ही टीम्सना आवश्यक
एसआरच आणि एलएसजीमध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन सामने झाले आहेत. दोन्हीवेळा सुपर जायंट्सने विजय मिळवलाय. लखनौ सुपर जायंट्सला सुद्धा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही टीम्ससाटी उद्याची मॅच महत्वाची असेल.
Dream 11 Prediction:
कॅप्टन- क्विंटन डिकॉक
उपकर्णधार- हेनरिक क्लासन
विकेटकीपर- क्विंटन डिकॉक
फलंदाज – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, आयुष बडोनी
ऑलराऊंडर- एडन मार्करम, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस
गोलंदाज – भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, रवि बिश्नोई
SRH ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, विवरांत शर्मा, एडन मार्कराम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एम जॅनसेन, ग्लेन फिलिप्स, एच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, एस मार्केडें
लखनौ सुपर जायंट्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मार्कस स्टॉयनिस, वायएस ठाकूर, काइल मेयर्स, दीपक हुड्डा, क्रृणाल पंड्या (कॅप्टन), स्वप्निल सिंह, निकोलस पूरन, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), आवेश खान, रवी बिश्नोई, मोहसीन खान