Suryakumar Yadav IPL 2023 : फक्त 2 शॉट खेळून सूर्यकुमारने गुजरातचा ‘गेम’ केला, मानलं तुला सूर्या, VIDEO

| Updated on: May 13, 2023 | 9:53 AM

Suryakumar Yadav IPL 2023 : दव पडल्यानंतर सूर्याने लगेच स्ट्रॅटजी कशी बदलली? त्याबद्दल सांगितलं. मॅच सुरु असतानाच सूर्यकुमार यादवने काल स्ट्रॅटजी बदलली. या बद्दल त्याने सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीच्यावेळी सांगितंल.

Suryakumar Yadav IPL 2023 : फक्त 2 शॉट खेळून सूर्यकुमारने गुजरातचा गेम केला, मानलं तुला सूर्या, VIDEO
IPL 2023 Suryakumar Yadav
Follow us on

मुंबई : मुंबई इंडियन्सने शुक्रवारी गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादव या विजयाचा नायक ठरला. त्याने तुफानी सेंच्युरी झळकवली. 49 चेंडूत नाबाद 103 धावा फटकावल्या. मुंबईच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरातचा पराभव झाला. सूर्यकुमार यादवच्या शतकामध्ये 2 शॉट्सनी महत्वाची भूमिका बजावली. मॅच संपल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने त्याबद्दल सांगितलं.

सूर्यकुमार यादव 360 डिग्रीचा बॅट्समन आहे. वानखेडेवर काल बॅटिंग करताना काल त्याने 2 फटक्यांचा जास्त वापर केला. शतक झळकवण्यासाठी त्याने मैदानावरील सर्व कोपरे नाही, फक्त दोन कोपऱ्यांचा जास्त वापर केला.

मॅच सुरु असताना बदलली स्ट्रॅटजी

आता तुम्ही विचार करत असाल, सूर्यकुमार यादव 2 शॉटच जास्त का खेळला? तर, त्याच कारण आहे, मैदानावरील परिस्थिती. मॅच सुरु असतानाच सूर्यकुमार यादवने काल स्ट्रॅटजी बदलली. या बद्दल त्याने सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीच्यावेळी सांगितंल.

दव पडल्यानंतर काय केलं?

ही माझी बेस्ट T20 इनिंग होती, असं तुम्ही म्हणू शकता. आम्ही प्रथम फलंदाजी करताना अशी बॅटिंग केली, जशी 200 प्लस धावांचा पाठलाग करताना करतो. मैदानात 7 व्या, 8 व्या ओव्हर दरम्यान दव पडला. त्यानंतर मला माझ्या बॅटिंगचा प्लान बदलावा लागला.

दोन साइडलाच मारले शॉट

मैदानात दव पडल्यानंतर सूर्याने स्ट्रेट चेंडू मारण्याचा विचार सोडून दिला. त्याच्या डोक्यात फक्त 2 शॉट्स होते. थर्ड मॅनच्यावरुन स्कूप आणि दुसरा स्क्वेयर लेगवरुन फ्लिक


360 डिग्री बॅटिंगबद्दल सूर्या म्हणाला….

360 डिग्री बॅटिंगबद्दल सूर्याला प्रश्न विचारला, त्यावर त्याने भरपूर फलंदाजीच्या सरावामुळे हे शक्य झाल्याच सांगितलं. मी बॅटिंगला मैदानात उतरतो, तेव्हा माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी क्लियर असतात, मला काय करायच आहे.

सूर्या किती मिनिट्स क्रीझवर होता?

11 वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये डेब्यु करणाऱ्या सूर्यकुमार यादवने IPL मध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं. त्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा फटकावल्या. यात 11 फोर आणि 6 सिक्स आहेत. सूर्यकुमार यादवची इनिंग 73 मिनिटांची होती. त्याने प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं.