IPL 2023 साठी MS Dhoni उतरला मैदानात, सुरु केली मेहनत पहा VIDEO

| Updated on: Jan 20, 2023 | 1:29 PM

IPL 2023 - फक्त धोनीचा खेळ पाहण्यासाठी CSK च नाही, तर जगभरातील कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी आतुर असतात. धोनीच वाढत वय लक्षात घेता दरवेळी आयपीएल सुरु होण्याआधी धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगते.

IPL 2023 साठी MS Dhoni उतरला मैदानात, सुरु केली मेहनत पहा VIDEO
Ms dhoni
Image Credit source: instagram
Follow us on

चेन्नई: IPL सुरु झाल्यापासून MS Dhoni आयपीएलच आकर्षण राहिला आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालाय. पण आयपीएलमध्ये त्याची जादू आजही कायम आहे. फक्त धोनीचा खेळ पाहण्यासाठी CSK च नाही, तर जगभरातील कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी आतुर असतात. धोनीच वाढत वय लक्षात घेता दरवेळी आयपीएल सुरु होण्याआधी धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगते. धोनीचा खेळ पाहिल्यानंतर या चर्चेत दम नसल्याच लक्षात येतं.

धोनी हुकूमाचा एक्का

हे सुद्धा वाचा

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असला, तरी आयपीएलमध्ये तो त्याच जोशात फटकेबाजी करताना दिसतो. त्याच वय वाढलय असं अजिबात वाटत नाही. याचमुळे धोनी भारतातील इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा ठरतो. धोनी चेन्नई सुपर किंग्सचा हुकूमाचा एक्क आहे.

धोनीची तयारी सुरु

धोनी स्वत: परफॉर्म करतोच, पण त्याच्या क्रिकेटिंग ब्रेनमुळे CSK टीमची आयपीएलमध्ये एक वेगळी दहशत आहे. मुंबई इंडियन्सपाठोपाठ CSK ने आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपद मिळवली आहेत. आता आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये धोनीची हीच जादू पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. धोनीने आतापासूनच आयपीएलची तयारी सुरु केलीय. त्याचा पहिला व्हिडिओ समोर आलाय.


पावर हिटिंगवर लक्ष

धोनीने ट्रेनिंग सेशनमध्ये चांगलीच मेहन घेतली. धोनीने बॅटिंगचा सराव करताना पावर हिटिंगवर लक्ष केंद्रीत केलं. धोनीच्या खेळाच वैशिष्टय म्हणजे तो टीमच्या गरजेनुसार खेळतो. धोनी आता 41 वर्षांचा आहे. पण संघाला गरज असते, तेव्हा तो चौकार-षटकारही सहज मारतो. धोनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत नाही. फक्त तो आयपीएलमध्ये खेळतो. या वयात खेळताना धोनीसाठी फिटनेस महत्त्वाचा ठरणार आहे.

चेपॉकवर स्पेशल कॅम्प

तीन वर्षानंतर सीएसकेची टीम चेपॉकवर खेळताना दिसणार आहे. सीएसके मॅनेजमेंटने चेपॉकवर विशेष ट्रेनिंग सेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. कोच स्टीफ्न फ्लेमिंग आणि कॅप्टन धोनीने चेन्नाई फेब्रुवारी-मार्चमध्ये स्पेशल कॅम्प घ्यायला सांगितला आहे.