IPL 2024 : मुंबई इंडियन्स नंतर आता या संघाचाही कर्णधार बदलला जाण्याची शक्यता

| Updated on: Dec 19, 2023 | 4:58 PM

IPL 2024 Auction : दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव सुरु आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली आहे. खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी कांटे की टक्कर दिसत आहे. यंदाच्या आयपीएलमधला दुसरा सर्वात महागडा ठरलेला खेळाडूला कर्णधार बनवले जाण्याची शक्यता आहे. कोणता आहे तो संघ जाणून घ्या.

IPL 2024 : मुंबई इंडियन्स नंतर आता या संघाचाही कर्णधार बदलला जाण्याची शक्यता
ipl 2024
Follow us on

IPL 2024 : यंदा IPL 2024 चा लिलाव दुबईत सुरु आहे. अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागत आहे. तर अनेक मोठ्या खेळाडूंवर फॉर्ममध्ये नसल्याने कोणीही बोली लावत नाहीयेत. जे खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आहेत त्यांच्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सने आपला कर्णधार बदलल्याची घोषणा केली होती. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला आता कर्णधार करण्यात आलं आहे. यावर काही चाहत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुंबई नंतर आता आणखी एका संघाचा खेळाडू बदलला जाण्याची शक्यता आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूवर पैशांचा वर्षाव केला आहे. हा खेळाडू आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे IPL 2024 च्या मोसमासाठी सनरायझर्स हैदराबादचा तो कर्णधार बनू शकतो.

हैदराबादचा नवा कर्णधार होणार?

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला विकत घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात बोली युद्ध झाले, पण शेवटी हैदराबाद संघाने बाजी मारली. कमिन्सला खरेदी करण्यासाठी त्यांनी 20 कोटी 50 लाख रुपये मोजले. आयपीएलच्या इतिहासात लिलावात विकला गेलेला तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली खेळला होता. पण त्यांना काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. संघाने फक्त चार सामने जिंकले होते. त्यामुळे आता हैदराबाद संघाचा कर्णधार बगलला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सनरायझर्स हैदराबाद संघाने पॅट कमिन्सवर सर्वात जास्त पैसे लावून विकत घेतले.

ऑस्ट्रेलियाने जिंकला विश्वचषक

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2023 चा एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. तो आक्रमक देखील फलंदाजी करतो. आयपीएलमध्ये त्याने 42 सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने 379 धावा केल्या असून 45 विकेट घेतले आहेत.