CSK Probable Playing XI: 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये पार पडलेल्या IPL 2024 लिलावानंतर, आता IPL 2024 साठी सर्व संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी सर्वाधिक चर्चेत आहे तो धोनी याचा संघ चेन्नई सुपर किंग्स. कारण CSK ने लिलावात 6 खेळाडूंना खरेदी केले आहे. शार्दुल ठाकूर (4 कोटी), रचिन रवींद्र (1.80 कोटी), डॅरिल मिशेल (14 कोटी), समीर रिझवी (8.40 कोटी), मुस्तफिजूर रहमान (2 कोटी), अरावेली अवनीश (20 लाखांमध्ये खरेदी) या खेळाडूंना लिलावात खरेदी केले आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2024 च्या लिलावानंतर, चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्लेइंग 11 कसा असेल याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. चेन्नईच्या चाहत्यांमध्येही याबद्दल चर्चा सुरू आहे, म्हणून संभाव्य 11 चा भाग असलेल्या नावांवर एक नजर टाकूया.
प्लेइंग 11 मध्ये एकावेळी फक्त चार खेळाडूंचा समावेश करू शकता आणि अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकासाठी मोईन अली आणि डॅरिल मिशेल या दोन परदेशी खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायला मिळतेय.
रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल/मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महिष टीक्षाना, मथिशा पाथिराना.
CSK टीम
अजय मंडल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, महिष टेकशाना, मथिशा पाथिराना, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी (कर्णधार), मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हांगेकर, रवींद्र जडेजा, शेख राव, रविंद्र गडेजा, रवींद्र गडेजा. , शिवम दुबे, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, शार्दुल ठाकूर, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अरावेली अवनीश.