दिनेश कार्तिकने केले टी 20 क्रिकेटमध्ये अनोखे ‘तिहेरी शतक’, असा विक्रम करणारा पहिला खेळाडू

| Updated on: Apr 04, 2024 | 9:03 AM

IPL 2024 Dinesh karthik Stats: दिनेश कार्तिक याने 390 सामन्यात 346 डावांत फलंदाजी केली आहे. त्यात तो 81 वेळा नाबाद राहिला आहे. त्याची सरासरी 27.04 आहे. तसेच 135.79 स्ट्राइक रेट आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 7,167 धावा केल्या आहेत. त्यात 32 अर्धशतक आहेत.

दिनेश कार्तिकने केले टी 20 क्रिकेटमध्ये अनोखे तिहेरी शतक, असा विक्रम करणारा पहिला खेळाडू
dinesh karthik
Follow us on

आयपीएलचा धमका सुरु आहे. आयपीएलमध्ये रोज नवीन नवीन विक्रम होत आहे. टी 20 क्रिकेटमध्ये दिनेश कार्तिक याच्या नावावर अनोखा विक्रम झाला आहे. यष्टीरक्षक अन् फलंदाज असणाऱ्या दिनेश कार्तिक याने टी 20 क्रिकेटमध्ये इतिहास निर्माण केला आहे. एकाच देशात 300 टी 20 सामने खेळण्याचा विक्रम कार्तिक याच्या नावावर जमा झाला आहे. जगात टी 20 क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त सामने खेळणारे खेळाडू आहेत. परंतु एकाच देशात 300 सामने आता फक्त दिनेश कार्तिक याच्या नावावर झाले आहेत. हे सर्व सामने दिनेश कार्तिक भारतात खेळला आहे. लखनऊ विरुद्ध खेळताना दिनेश कार्तिकच्या नावावर हा विक्रम जमा झाला.

कार्तिकनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर

दिनेश कार्तिक ( Dinesh karthik ) याच्यानंतर सर्वाधिक टी20 खेळण्याच्या यादीत धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याचा क्रमांक आहे. रोहित शर्मा 289 टी20 सामने भारतातच खेळला आहे. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी 262 सामने खेळून तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लडचा समित पटेल 259 खेळून चौथ्या तर विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. विराटने भारतात 258 टी20 सामने खेळला आहे.

2006 मध्ये कार्तिक खेळला पहिला टी20

दिनेश कार्तिक आतापर्यंत 390 टी20 सामने खेळला आहे. त्यातील 300 सामने भारतात खेळला आहे. दिनेश कार्तिक याने 2006 मध्ये दक्षिण अफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे टी20 क्रिकेटचा पहिला सामना खेळला होता. गेल्या 18 वर्षांपासून दिनेश कार्तिक टी20 क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. दिनेश कार्तिक याने देशातंर्गत क्रिकेटमध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे. तसेच महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर यष्टीरक्षक म्हणून बाजू सांभाळली आहे.

हे सुद्धा वाचा

कार्तिक याची कारकीर्द अशी

दिनेश कार्तिक याने 390 सामन्यात 346 डावांत फलंदाजी केली आहे. त्यात तो 81 वेळा नाबाद राहिला आहे. त्याची सरासरी 27.04 आहे. तसेच 135.79 स्ट्राइक रेट आहे. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 7,167 धावा केल्या आहेत. त्यात 32 अर्धशतक आहेत. परंतु दिनेश कार्तिक याला एकही शतक करता आले नाही. त्याचे सर्वोच्च धावसंख्या नाबाद 97* राहिली आहे.