मुंबई : अलीकडेच मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला. IPL च्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरुन दूर केलं. त्याच्याजागी गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. रोहितला हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना पसंत पडलेला नाही. सोशल मीडियावर यावरुन बरेच वादविवाद सुरु आहेत. रोहितला हटवल्यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्सची संख्या कमी झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावल. मुंबई आणि चेन्नई हे आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी संघ आहेत. दोन्ही टीम्सनी सर्वाधिक पाचवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावलं आहे. आता रोहितच्या जागी हार्दिकला मुंबई इंडियन्सच कॅप्टन बनवण्याच्या निर्णयाचा अनेकजण विरोध करतायत.
विरोधाचे सूर खूप तीव्र असताना आता हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ एक आवाज आलाय. एका प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूने या निर्णयाच समर्थन केलय. प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रोहितच्या जागी हार्दिकला कॅप्टन बनवण्याच्या निर्णयावर आपल मत व्यक्त केलय. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली संघाला नव्या, ताज्या विचारांची आवश्यकता आहे, असं मॅनेजमेंटच मत असाव असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएल ट्रॉफी जिंकली. यंदाच्या वर्षी गुजरात टायटन्सच्या टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.
रोहितबद्दल काय म्हटलं?
“आपण चूक-बरोबर यामध्ये जायच नाही. संघाच्या भल्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. मागच्या दोन वर्षात फलंदाज म्हणून रोहितच्या योगदान कमी आहे. याआधी तो मोठी धावसंख्या उभारायचा. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईच्या क्रमवारीत घसरण झाली” याकडे गावस्करांनी लक्ष वेधलं. “याआधी रोहित शर्माच्या फलंदाजीत जी मजा होती, ती आपण मिस करतोय. सततच क्रिकेट आणि भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे रोहित थकला असावा” असं गावस्कर म्हणाले.
म्हणून त्याला कॅप्टन बनवलं असेल?
“हार्दिक तरुण कर्णधार आहे, त्याने रिझल्ट दिले आहेत. तो विचार करुनच त्यांनी निर्णय घेतला असेल. हार्दिकने दोनदा फायनलमध्ये गुजरातच नेतृत्व केलं. 2022 मध्ये त्याने विजेतेपद मिळवून दिलं. हा सगळा विचार करुनच मुंबई इंडियन्सच त्याला कॅप्टन बनवलं असेल” असं गावस्कर म्हणाले.