IPL2024: मिचेल स्टार्कची एक-एक विकेट केकेआरला 1.46 कोटीला, आयपीएलमध्ये कामगिरी अशी राहिली

| Updated on: May 28, 2024 | 6:55 AM

IPL2024: स्टार्कची आयपीएलमधील कामगिरी शानदार राहिली. त्याने 14 सामन्यांत 17 गडी बाद केले. त्याची सरासरी 26.11 राहिली. 33 धावा देऊन 4 विकेट हे त्याचे आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले. केकेआरला स्टार्कचा एक-एक विकेट 1.46 कोटीला पडला.

IPL2024: मिचेल स्टार्कची एक-एक विकेट केकेआरला 1.46 कोटीला, आयपीएलमध्ये कामगिरी अशी राहिली
mitchell-starc
Follow us on

आयपीएल 2024 मधील विजेतेपद कोलकाता नाइट राइडर्सने मिळवले. केकेआरच्या विजेतेपदानंतर संघाच्या जोरदार कामगिरीची चर्चा होत आहे. विजेतेपदाचे श्रेय कर्णधार श्रेयस अय्यर, मेंटर गौतम गंभीर यांच्याप्रमाणे संघातील इतर खेळाडूंनाही जात आहे. अंतिम सामन्यात हैदराबादच्या संघाचा पराभावामागे मिचेल स्टार्क याची घातक गोलंदाजी करणीभूत आहे. आयपीएल इतिहासात सर्वात महाग खेळाडू ठरलेला मिचेलने इतिहास निर्माण केला. मिचेल स्टार्क आयपीएल 2024 मधील अंतिम सामन्यात प्लेयर ऑफ द मॅच बनला. त्याने 3 षटकांत 14 धावा देत दोन गडी बाद केले. नॉकआउटमध्ये दोन वेळा मॅन ऑफ द मॅच बनणारे तो पहिला खेळाडू ठरला.

सुरुवातीला हैदराबादला दिले धक्के

आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारे ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क याने आपल्या घातक गोलंदाजीमुळे इतिहास निर्माण केला. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरणाऱ्या हैदराबादच्या संघातील टॉप ऑर्डरला स्टार्कने बाद केले. या धक्क्यातून हैदराबादचा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही. हैदराबादचा संघ 18.3 षटकात 113 धावच करु शकला.

स्टार्कने 3 षटकांत 14 धावा देत 2 गडी बाद केले. त्याने अभिषेक शर्माला बोल्ड करत पहिले यश मिळवले. त्यानंतर राहुल त्रिपाठीला झेलबाद बाद करत हैदराबाद संघाला दुसरा धक्का दिला. केकेआरने हा सामना 8 गडी राखून जिंकल्यानंतर स्टार्कला प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडण्यात आले.

हे सुद्धा वाचा

एक-एक विकेट 1.46 कोटीला

स्टार्कची आयपीएलमधील कामगिरी शानदार राहिली. त्याने 14 सामन्यांत 17 गडी बाद केले. त्याची सरासरी 26.11 राहिली. 33 धावा देऊन 4 विकेट हे त्याचे आयपीएलमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन राहिले. केकेआरला स्टार्कचा एक-एक विकेट 1.46 कोटीला पडला.

मिचेल स्टार्कला केकेआरने लिलावात 24.75 कोटी रुपयांमध्ये घेतले होते. स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, स्टार्कने सतत धावा दिल्या, त्यामुळे त्याला एका सामन्यासाठी प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्याला सूर गवसला. त्याने पहिल्या क्वालीफायरमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे तो प्लेवर ऑफ द मॅच झाला होता.