IPL 2024 मध्ये मुंबईची सुरुवात चांगली झालेली नाही. 4 पैकी फक्त एका सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवलाय. 2 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे. सलग 3 सामने हरल्यानंतर मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळाला. या पहिल्या विजयाने मुंबईच्या अपेक्षा वाढल्या आहेत. MI चा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी टीमचा कसून सराव सुरु आहे. आतापर्यंत मुंबईचे बॉलर्स काही खास प्रदर्शन करु शकलेले नाहीत. मुंबईच्या गोलंदाजांवर लसिथ मलिंगा विशेष मेहनत घेत आहेत. गोलंदाजांना चेंडू स्टम्पसना हिट करण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. MI ने या ट्रेनिंग सेशनची क्लिप सोशल मीडियावर शेअर केलीय. या दरम्यान मलिंगाने असं काही केलं, की ज्यामुळे पाहणारे हैराण झाले.
मलिंगा सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसह MI च्या गोलंदाजांना यॉर्कर टाकून सिंगल स्टम्प उडवण्याच प्रशिक्षण देत होता. तीन-चार बॉलर्स सिंगल स्टम्प उडवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना यश मिळालं नाही. त्याचवेळी 40 वर्षाच्या मलिंगाने प्रोफेशन क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात सिंगल स्टम्प उडवला. तुम्ही हा व्हिडिओ पाहून हैराण व्हाल. युवा गोलंदाज ज्यात अपयशी ठरत होते, तिथे मलिंगाच्या यॉर्करचा जलवा अजूनही कायम आहे. MI ने मलिंगासाठी कौतुकाचे शब्द लिहिले. ‘काहीच नाही बदलल यार, अजूनही सगळ तसच आहे’
𝐊𝐮𝐜𝐡 𝐧𝐚𝐡𝐢 𝐛𝐚𝐝𝐥𝐚 𝐲𝐚𝐚𝐫 🥹
𝘈𝘢𝘫 𝘣𝘩𝘪 𝘴𝘢𝘣 𝘬𝘶𝘤𝘩 𝘷𝘢𝘪𝘴𝘦 𝘬𝘢 𝘷𝘢𝘪𝘴𝘢 𝘩𝘪 𝘩𝘢𝘪𝘯 🤩#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @malinga_ninety9 pic.twitter.com/6MMKxhigwU
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2024
मलिंगाच IPL करिअर
लसिथ मलिंगाने 2009 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळायला सुरुवात केली. 2019 मध्ये रिटायर होईपर्यंत मलिंगा याच टीमकडून खेळला. 122 सामन्यात 7.12 च्या इकोनॉमीने 170 विकेट काढल्या. मुंबई इंडियन्सने 2023 साली मलिंगाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली. मलिंगाने आपल्या बॉलिंगच्या बळावर मुंबई इंडियन्सला अनेक कठीण परिस्थितीमधील सामने जिंकून दिले. मुंबईची टीम चालू सीजनमध्ये चेंडूने विशेष कमाल दाखवू शकलेली नाही. पण अपेक्षा आहे की, यॉर्कर किंग आणि बॉलिंग कोच मलिंगच्या देखरेखीखाली गोलंदाज पुढच्या सामन्यात चांगलं प्रदर्शन करतील.