Mumbai Indians | आयपीएल 2024 च्या सीजनची 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्सची टीम नवीन कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली उतरणार आहे. रोहित शर्माला हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याची निवड केल्यापासून हार्दिक अनेकांच्या रडारवर आहे. जणू मुंबई इंडियन्सने काही चूकच केलीय, असं आता वाटू लागलय. रोहितला हटवून त्याच्याजागी हार्दिकची निवड करण्याचा निर्णय अनेक माजी क्रिकेटपटूंना पटलेला नाहीय. फॅन्सच्या मते, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा अपमान केलाय. आता याच मालिकेत एका माजी भारतीय क्रिकेटपटूने हार्दिक पांड्याला टोला लगावला आहे. आयपीएलआधी हार्दिक बरोबर फिट होतो, असं म्हटलय.
हार्दिक पांड्याला वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत झाली होती. सुरुवातीचे काही सामने खेळल्यानंतर हार्दिक नंतर सगळ्या सामन्यांना मुकला. हार्दिक दुखापतीमुळे कुठल्या मोठ्या स्पर्धेतून बाहेर होण्याची ही पहिली वेळ नाहीय. आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये हार्दिक पांड्याने आपली टीम बदलली. गुजरात टायटन्स ऐवजी तो आता मुंबई इंडियन्सच नेतृत्व करताना दिसेल. रोहित शर्माच्या जागी त्याला कॅप्टन बनवण्यात आलय. मुंबई इंडियन्सच्या बहुतांश फॅन्सना हा निर्णय पटला नाही.
Well said Praveen Kumar about hardik Pandya #HardikPandya #MI
— विजय (@bijjuu11) March 12, 2024
एक व्हिडिओ व्हायरल
माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमारने हार्दिक पांड्याला टोला लगावला आहे. सोशल मीडियावर प्रवीण कुमारचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. “तुम्ही देशासाठी खेळत नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये राज्यासाठी खेळत नाही आणि बरोबर आयपीएलच्या आधी फिट होतो. असं झालं नाही पाहिजे. तुम्ही देशासाठी, राज्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे. पण काहीजण आता आयपीएलला महत्व देतात” असं प्रवीण कुमार म्हणाले.