आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई संघाचा 18 धावांनी पराभव केला. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ शेवटच्या स्थानी राहिली. मुंबई इंडियन्सचा शेवट गोड झाला नाही. या सामन्यात मुंबईला 215 धावांचे आव्हान असताना 20 ओव्हरमध्ये 196 धावांपर्यंतच पोहचता आले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा हा 10 वा पराभव झाला. मुंबईचा संघ या हंगामातील सर्वात शेवटी 10 व्या स्थानी राहिला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा मालक नीता अंबानी आणि रोहित शर्मा यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओ नीता अंबानी रोहित शर्मा याला मुंबई इंडियन्सच्या संघात राहण्याचा सांगत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. काय आहे तो व्हिडिओ…
रोहित शर्मा याने या सामन्यात 38 चेंडूत 68 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर प्रेक्षकांनी त्याला उभे राहून त्याचे कौतूक केले. चाहत्यांच्या मते, वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून हा शेवटचा सामना खेळत आहे.
Nita ambani trying to convence Rohit Sharma to stay in Mumbai Indians . #rohitsharma #mivslsg #viratkohli #mumbaiindians pic.twitter.com/EzktpnaHVe
— Indian cricket Fc (@Hitman450745) May 17, 2024
सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे एमआयच्या मालक नीता अंबानी यांनी सामन्यानंतर रोहितसोबत केलेले दीर्घ चर्चा केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या चर्चेत अनेकांना असा विश्वास आहे की नीता अंबानी रोहित शर्माला मुंबई इंडियन्समध्ये राहण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत होती. परंतु त्याची पुष्टी करण्यासाठी ऑडिओ त्या व्हिडिओत नाही. त्यामुळे दोघांचा संवाद ऐकता येत नाही.
इस वीडियो को ध्यान से देखिए
Rohit Sharma मैदान से बाहर जा रहे हैं और Hardik Pandya की एंट्री हो रही है at the same time for Mumbai Indians in IPL #RohitSharma #HardikPandya #IPL #MumbaiIndians #MIvsLSG pic.twitter.com/GmgjDfRdyy
— Pankaj Mishra 🇮🇳 (@pankajplmishra) May 17, 2024
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानातून बाहेर जात आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याची मैदानात एन्ट्री होत आहे. पंकज मिस्त्रा नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा, रोहित बाहेर जात आहे आणि हार्दिक आत येत आहे, असे म्हटले आहे. त्याच्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे.