IPL 2024 चा सीजन सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंच्या प्रदर्शनावर नजर आहे. कारण या टुर्नामेंटनंतर थेट T20 वर्ल्ड कप 2024 सुरु होणार आहे. टीम इंडियात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएल ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु करुन प्रभावित केलय. युवा विकेटकीपर फलंदाज ध्रुव जुरेल यापैकीच एक आहे. T 20 वर्ल्ड कपमध्ये कीपर-फलंदाज (फिनिशर) च्या रोलसाठी त्याला दावेदार मानल जातय. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये ध्रुव जुरेलचा जलवा दिसलेला नाही. आता अचानक असे आरोप केले जातायक की, संजू सॅमसन जाणूनबुजून त्याला संधी देत नाहीय. आता या आरोपात कितपत तथ्य आहे?
मागच्या सीजनमध्ये ध्रुव जुरेलने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून छोट्या पण दमदार इनिंग खेळून ओळख बनवली होती. उत्तर प्रदेशच्या या विकेटकीपर फलंदाजाला फेब्रुवारी-मार्च महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरीजनमध्ये कीपर म्हणून संधी मिळाली होती. चौथ्या कसोटीत हा प्लेयर स्टार ठरला होता. त्यानंतर आयपीएल आणि T 20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये त्याला पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. पण अजून पर्यंत तो टीममध्ये दिसलेला नाही.
संजू सॅमसन कारणीभूत आहे का?
संजू सॅमसन याला कारणीभूत आहे का?. असे आरोप का होतायत? ते आधी जाणून घेऊया. सोशल मीडियावर अनेक यूजर्स संजू सॅमसनला टार्गेट करतायत. त्यांचं असं म्हणण आहे की, संजूला टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्वत:च स्थान पक्क करायच आहे. त्याची ध्रुव बरोबर स्पर्धा आहे. दोन्ही खेळाडू विकेटकीपर-फलंदाज फिनिशर म्हणून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दावेदार आहेत.
Sanju Samson won’t send in Dhruv Jurel to bat because he knows Jurel will hit him out of the race for WorldT-20! Such a pity player! Shame!!
— Prashant Kumar (@scribe_prashant) April 10, 2024
ध्रुव प्लेइंग इलेव्हनचा भाग होता, पण…
म्हणून संजू सॅमसन ध्रुव जुरेलला जास्त संधी देत नाहीय का?. राजस्थानची टीम या सीजनमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळली आहे. पाचही सामन्यात ध्रुव प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण कीपिंग प्रत्येकवेळी सॅमसनने केली. हा तसा मुद्दा नाहीय. कारण जॉस बटलर सारखा दिग्गज कीपर असूनही सॅमसनचा राजस्थानसाठी कीपिंग करतो. कारण त्यामुळे गेम समजून घेण्यास मदत होते.
Sanju Samson, ladies and gentlemen, who thinks Ashwin is better batter and hitter than Dhruv Jurel pic.twitter.com/M8HyOdxvuZ
— Abhinav Rajput (@Abhinavrt) April 10, 2024
प्रश्न त्या दोन सामन्यांमुळे निर्माण झाला
सर्वात आधी ही गोष्ट समजून घेणं गरजेच आहे की, बॅटिंग ऑर्डर फक्त कॅप्टनच ठरवत नाही, तर हेड कोचची सुद्धा त्यात भूमिका असते. म्हणजे जुरेल कितव्या नंबरवर बॅटिंग करणार हा एकट्या सॅमसनचा निर्णय नसतो. जुरेलला 5 पैकी 3 सामन्यात बॅटिंगची संधी मिळालीय. त्यात त्याचा स्कोर 20 (12 चेंडू), 20 (12 चेंडू) आणि 2 (3 चेंडू) असा आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळालीच नाही. प्रश्न त्या दोन सामन्यांमुळे निर्माण झाला, जिथे सुरुवातीला विकेट लवकर गेल्यानंतरही जुरेलच्या जागी आर. अश्विनला पाठवण्यात आलं. दिल्ली विरुद्ध जुरेलला बॅटिंगची संधी मिळाली. त्याने 20 धावा सुद्धा केल्या. मुंबई विरुद्ध संधी मिळाली नाही. त्यावेळी सुद्धा जुरेलच्या जागी शुभम दुबेला पाठवण्यात आलं.
दबाव झेलण्याची क्षमता
जुरेल सोबत असं करण्यामागे काय कारण आहे? राजस्थानची टीम बॅटिग ऑर्डरमध्ये ठरलेल्या रोलनुसार फलंदाजांना उतरवत आहे. जुरेलचा रोल फिनिशरचा आहे. हाणामारीच्या षटकात वेगाने धावगती वाढवण हा त्याचा रोल आहे. टीम इंडियातही जुरेलचा हाच रोल आहे. तर्क असाही आहे की, जुरेलला अश्विनच्या आधी पाठवायला पाहिजे होतं, कारण अश्विनमध्ये दबाव झेलण्याची क्षमता आहे.
Is Sanju Samson deliberately denying Dhruv Jurel a contention for wt20, so reluctant to offer any opportunity to Jurel this season
— Halsey (@meandmessi) April 10, 2024
आरोपात दम दिसत नाही, कारण….
दिल्ली विरुद्ध जुरेल 14 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला. 18 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. RCB विरुद्ध चेज करताना 26 चेंडूत 29 धावांची गरज होती, तेव्हा क्रीजवर आलेला जुरेल फक्त 3 चेंडूत आऊट झाला. म्हणजे जुरेल वेगाने धावा बनवण्यास सक्षम आहे, पण मोठी इनिंग खेळण्याची गरज असताना तो अपयशी ठरला. जुरेलला फिनिशरचा रोल मिळालाय. त्या हिशोबाने त्याचा वापर होतोय. त्यामुळे त्याल जाणीवपूर्वक डावलल जातय, या आरोपात दम दिसत नाहीय.