IPL 2022: पंजाब टीमला आणखी एक मोठा झटका, राहुलनंतर या दिग्गजाने सोडली साथ

| Updated on: Dec 01, 2021 | 6:52 PM

पंजाबचे असिस्टंट कोच एंडी फ्लावर यांनाही कोट्यवधींची ऑफर आल्याने त्यांनीही पंजाबची साथ सोडली आहे. एंडी फ्लावर आता दोन टीम येत आहेत, त्यातील एका टीमसोबत जोडले जाण्याची शक्याता आहे.

IPL 2022: पंजाब टीमला आणखी एक मोठा झटका, राहुलनंतर या दिग्गजाने सोडली साथ
Follow us on

मुंबई : केएल राहुलच्या रिलीज होण्याने पंजाब टीमला मोठा झटका बसला आहे. अशात पंजाबला बसलेला दुसरा झटका पंजाब टीमला चिंतेत टाकणार आहे. पंजाबच्या मालकांकडून राहुलला रिलीज केल्यानंतर खुलासाही देण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबची टीम यंदाच्या आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूंसह उतरणार आहे. हे अजूनही निश्चित नाही. तसेच हे डॅमेज कंट्रोल रोखण्याचं कडवं आव्हान आता पंजाब टीमसमोर आहे.

पंजाबच्या कोचला कोट्यवधींची ऑफर

पंजाबचे असिस्टंट कोच एंडी फ्लावर यांनाही कोट्यवधींची ऑफर आल्याने त्यांनीही पंजाबची साथ सोडली आहे. एंडी फ्लावर आता दोन टीम येत आहेत, त्यातील एका टीमसोबत जोडले जाण्याची शक्याता आहे. त्यांनी अलिकडेच आपला राजीनामा टीमकडे पाठवला आहे. आणि तो मंजुरही झाला आहे अशा बातम्या समोर आल्या आहेत. अशा झुंजारू कोचने पंजाबची साथ सोडल्यानं पंजाबसाठी ही धोक्याची घंटा असल्यांच बोललं जात आहे. त्यामुळे यंदाचा लिलाव जोरदार चर्चेत आला आहे. ते 2020 आधी पहिल्यांदाच पंजाब टीम आणि आयपीएलशी जोडले गेले होते.

राहुलला नव्या टीमकडून ऑफर

पंजाबचा स्टार खेळाडू केएल राहुल याला पंजाबने रिलीज केलं आहे. मात्र राहुलला आधीपासूनच लखनऊ टीमकडून मोठी ऑफर असल्याचं बोललं जात आहे. पंजाबच्या मालकांनी हा नियमभंग असल्याची तक्रारही बीसीसीआयकडे केली आहे. पंजाब राहुलला सोबत ठेवणार होती, पण राहुलला पंजाबसोबत खेळायचं नव्हते, त्यामुळे नाईलाजास्तव पंजाबला राहुलला रिलीज करावं लागलं. राहुल आणि एंडी फ्लावर या दोघांनी पंजाबसाठी एकत्र काम केलं असल्यानं ते राहुलसह लखनऊ टीमशी जोडले जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Twitter CEO: ट्विटरचा नवा सीईओ मुळ भारतीय आहे, मग पाकिस्तानची एवढी का खिल्ली उडवली जातेय? वाचा कारणं

परदेशात राहून राजकारण कसं होईल?; ममता बॅनर्जींचा राहुल गांधींना टोला

भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे, काँग्रेस हाच पर्याय : नाना पटोले