एक म्हणतो ‘हा तर कोंडा रेड्डी’ तर दुसरा म्हणतो ‘हा भाजपात जाणार!’ माणूस साधासुधा नाय, आडनाव आहे गांधी!

| Updated on: Feb 14, 2022 | 1:46 PM

सभागृहातील ग्लॅमरस चेहऱ्यांबरोबर आणखी एका माणसाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्याच्यावरुन अनेक मीम्सही तयार झाले.

एक म्हणतो ‘हा तर कोंडा रेड्डी’ तर दुसरा म्हणतो ‘हा भाजपात जाणार!’ माणूस साधासुधा नाय, आडनाव आहे गांधी!
Follow us on

मुंबई : IPL च्या 15 व्या सीजनसाठी बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन पार पडलं. शनिवार-रविवार असे दोन दिवस दोन दिवस चाललेल्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रेंचायजींना वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावली. बंगळुरुच्या ज्या सभागृहात हे मेगा ऑक्शन सुरु होतं, तिथल्या घडामोडींची सोशल मीडियावर (Social Media) बरीच चर्चा झाली. सभागृहातील ग्लॅमरस चेहऱ्यांबरोबर आणखी एका माणसाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. त्याच्यावरुन अनेक मीम्सही तयार झाले. कारण जागेवरुन बसून या माणसाने कामच तसं केलं. ज्यामुळे सोशल मीडियाला त्याची दखल घ्यावी लागली. दिल्लीच्या ऑक्शन टीममधला (Auction Team) हा माणूस खेळाडूंची किंमत वाढवत होता. तो खेळाडूंवर बोली लावायचा, पण जेव्हा खेळाडू घेण्याची वेळ यायची, तेव्हा मात्र चिडीचूप असायचा. शेवटी ज्यानं अंतिम बोली लावलीय, त्याला नाईलाजानं जास्त पैसे मोजून खेळाडू खरेदी करावे लागत होते. ऑक्शनमध्ये रंगत आणणारा हा माणूस कोण आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.

कोण आहे किरण कुमार गांधी?
ऑक्शनमध्ये खेळाडूंचा किंमत वाढवणाऱ्या या माणसाचं नाव आहे, किरण कुमार गांधी. किरण कुमार गांधी दिल्ली कॅपिटल्सच्या ऑक्शन टीममध्ये होते. जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चरचे सीईओ, एमडी आणि संचालक म्हणून किरण कुमार गांधी ओळखले जातात. दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावत ते नेहमीच दिसून आले आहेत. अलिकडच्या हंगावात एक चांगला संघ तयार करण्यासाठीच्या मॅनेजमेन्टचा एक महत्त्वाचा चेहरा म्हणून किरण कुमार गांधींकडे पाहिलं जातं. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मालकी हक्कांमध्येही किरण कुमार गांधींचाही वाटा आहे.

किरण कुमार गांधींबद्दल नेटीझन्सनी वेगवेळ्या कमेंटस केल्या आहेत.

‘कोनपण का असेना, पण खेळाडूंचा फायदा होत आहे तर होउ द्या की..’ असं एका युजरने म्हटलं आहे.

‘ह्यो आहे GMR इन्फ्रास्ट्रक्चरचा CEO, M D किरण कुमार ग्रांधी..नाम तो सुना ही होगा’

‘ह्याला थांबवा ..अशाने महागाई अजुन वाढेल..पेट्रोलचे दर हाच वाढवत असेल..’

‘हा पहिला भिशी चालवायचा कि काय’

‘भाऊ नक्की भाजपात जाणार वाटतय’

‘हा कोंडा रेड्डी’

सोशल मीडियावर किरण कुमार गांधी यांच्याबद्दल अशा खूप गमतीशीर कमेंट केल्या आहेत.