TATA IPL 2022 Mega Auction चा आज दुसरा दिवस आहे. दहा फ्रेंचायजी वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावत असताना मुंबई इंडियन्सची रणनिती कोणालाच समजली नाही. अन्य फ्रेंचायजींच्या तुलनेत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सुरुवातीला खूप सावध बोली लावली. मुंबई इंडियन्सने दुपारपर्यंत फक्त दहाच खेळाडूंना विकत घेतलं होतं. मुंबई खेळाडूंना विकत घेतना इतकी आक्रमक बोली लावत नव्हतं, त्यामागे त्यांची पर्सही एक कारण होतं. खेळाडू रिटेन (Retain players) केल्यानंतर मुंबईच्या पर्समध्ये 48 कोटी उरले होते. काल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबईने 15.25 कोटी रुपये मोजून इशान किशनच्या रुपाने दिवसातला सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला होता. लिलावाची मुंबईची जी स्ट्रॅटजी आहे, त्यावर सोशल मीडियात टीकाही झाली. पण मुंबईने दिवसअखेर एक चांगला संघ बांधला. इंग्लंडचा जोफ्रा आर्चरही भविष्यात मुंबईकडून खेळणार आहे. मुंबई लिलावाच्या उर्वरित सत्रात कुठले खेळाडू विकत घेणार? त्याची चाहत्यांना उत्सुक्ता आहे. अखेर मुंबईचा अंतिम संघ समोर आला आहे.
आतापर्यंत मुंबईने लिलावात विकत घेतलेले खेळाडू
इशान किशन (15.25 कोटी)
डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी)
बासिल थम्पी (30 लाख)
मुरुगन अश्विन (1.6 कोटी)
जयदेव उनाडकट (1.30 कोटी)
मयंक मार्कंडे (65 लाख)
मोहम्मद अरशद ( 20 लाख)
रायली मेरिडिथ ( 1 कोटी)
टिम डेव्हिड (8.25 कोटी)
टायमल मिल्स (1.50 कोटी)
डॅनियल सॅम्स (2.60 कोटी)
जोफ्रा आर्चर (8 कोटी)
तिलक वर्मा (1.70 कोटी)
संजय यादव (50 लाख)
अनमोलप्रीत सिंह (20 लाख)
रामदीप सिंह (20 लाख)
राहुल बुद्धी (20 लाख)
शोकीन (20 लाख)
फॅबियन ऐलन (75 लाख)
अर्जुन तेंडुलकर (30 लाख)
आर्यन जुयाल (20 लाख)
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले 4 खेळाडू
पहिला खेळाडू – रोहित शर्मा, 16 कोटी रुपये.
दुसरा खेळाडू – जसप्रीत बुमराह, 12 कोटी रुपये.
तिसरा खेळाडू – सूर्यकुमार यादव, 8 कोटी रुपये.
चौथा खेळाडू – कायरन पोलार्ड, 6 कोटी रुपये
(मुंबईकडे 48 कोटी रुपये होते)