वनडे पाठोपाठ टेस्टमध्ये श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) दमदार पदार्पण केलं आहे. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.
संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्या नावाची बरीच चर्चा झाली. पण त्याला विराट कोहलीने एकाही कसोटीत खेळण्याची संधी दिली नाही.
श्रेयस अय्यरचं वैशिष्टय म्हणजे तो टी-20 आणि वनडे दोन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी एकदम परफेक्ट आहे.
श्रेयस अय्यर वेगाने धावा बनवू शकतो. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत संधी मिळायला पाहिजे होती.
वेगाने धावा बनवण्याचं कौशल्य त्याच्याकडे आहे. कसोटीमध्ये म्हणून तो उपयुक्त ठरु शकतो. पण विराट-द्रविड जोडगळीने दक्षिण आफ्रिकेत कसोटीत त्याला संधी दिली नाही.
पण यंदाच्या आयपीएलच्या मोसमात मुंबईच्या या खेळाडूचं नशीब चमकू शकतं.
आयपीएलमध्ये तीन-तीन संघ त्याच्यावर नजर ठेवून आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरकडे बघतेय. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
विराट कोहलीने RCB चे कर्णधारपद सोडल्यानंतर त्याच्याजागी कर्णधार म्हणून ते श्रेयसचा विचार करतायत.
RCB प्रमाणेच किग्ज इलेव्हन पंजाब आणि KKR ची सुद्धा त्याच्यावर नजर आहे. त्यामुळे मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. . कुठल्याही फ्रेंचायजीकडून संधी मिळाली, तर श्रेयसही कर्णधारपदासाठी इच्छुक आहे.
दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कॅप्टन बनवल्यानंतर श्रेयसने दिल्लीचा संघ सोडला. लखनऊ आणि अहमदाबाद या आयपीएलच्या दोन नवीन फ्रेंचायजींकडून त्याला कॅप्टनशिप मिळणार नसल्याने श्रेयसने या दोन संघांमध्ये रस दाखवलेला नाही.