मुंबई: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (DC vs KKR) आज आयपीएलमधला 41 वा सामना खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना चार विकेट राखून जिंकला. दिल्लीला विजयासाठी कोलकाताने 147 धावांचं टार्गेट दिलं होतं. पावर हिटर रोव्हमॅन पॉवेलने (Rovman powell) 19 व्या षटकातील श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन दिल्लीला विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सने आता आठ पैकी चार सामने जिंकल आहेत. चार मॅचेसमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तेच कोलकाताचा आज सहावा पराभव झाला. फक्त तीन मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. प्लेऑफची शर्यत लक्षात घेता, आजच्या सामन्यात विजय मिळवणं, दोघांसाठी महत्त्वाचं होतं. कुलदीप यादव आज दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने तीन षटकात 14 धावा देत चार महत्त्वाच्या विकेट मिळवल्या.
दिल्लीची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ माघारी परतला होता. उमेश यादवने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा जबरदस्त झेल घेतला. 17 धावात दिल्लीच्या दोन विकेट गेल्या होत्या. पण डेव्हिड वॉर्नर खेळपट्टीवर उभा राहिला. ललित यादव सोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी त्याने 65 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. वॉर्नरने 26 चेंडूत 42 धावा केल्या. त्याने आठ चौकार लगावले. उमेश यादवनेच त्याला बाद केलं.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध केकेआर स्पेशल HIGHLIGHTS एक नजर मारा
वॉर्नर पाठोपाठ ललिल यादवही माघारी परतला. ऋषभ पंतही स्वस्तात दोन धावांवर आऊट झाला. त्यावेळी दिल्लीचा डाव गडगडतो की, काय असं वाटलं होतं. पण अक्षर पटेल (24), रोव्हमॅन पॉवेल नाबाद (33) यांनी दिल्लीला विजयी पथावर नेलं.
A well-paced chase to seal the ✌?ictory ?#YehHaiNayiDilli | #IPL2022#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | #DCvKKR pic.twitter.com/My3fDtKYys
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 28, 2022
ऋषभ पंतने आज टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दिल्लीच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. अवघ्या 35 धावात त्याचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. पण श्रेयस अय्यरने पाचव्या विकेटसाठी नितीश राणासोबत 48 धावांची भागीदारी केली, तसंच नितीश राणाने संघ अडचणीत आज चांगला खेळ केला. त्याने 34 चेंडूत 57 धावा फटकावल्या. यात तीन फोर आणि चार सिक्स होते. त्यामुळे कोलकाताच्या टीमला 146 पर्यंत पोहोचता आलं. कुलदीप यादवने आज जबरदस्त गोलंदाजी केली. त्यालाच मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.