IPL च्या पुढच्या पाच सीजनसाठी मीडिया राइट्सच्या (IPL Media Rights) लिलावाचा आज दुसरा दिवस होता. आयपीएलच्या टेलीविजन आणि डिजिटल अधिकारांची विक्री करण्यात आली आहे. टीवी राइट्सची प्रति मॅच 57.50 कोटी आणि डिजिटल राइट्सची प्रति मॅच 48 कोटी रुपयांना पुढच्या पाच वर्षांसाठी विक्री करण्यात आली आहे. कोणी हे राइट्स विकत घेतलेत, त्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. टीवी राइट्सची बेस प्राइस 49 कोटी रुपये होती. डिजिटल राइट्सची बेस प्राइस 33 कोटी रुपये होती. दुसऱ्यादिवशी टीवी राइट्सची किंमत पहिल्या दिवसाच्या तुलनेत फक्त 50 लाख रुपयाने जास्त वाढली.
IPL मीडिया राइट्स लिलावाचा दुसरा दिवस संपला आहे. पॅकेज सी साठी बिडिंग सुरु आहे. उद्या यावर पुन्हा बोली प्रक्रिया सुरु होईल. सकाळी 11 वाजता पॅकेज सी साठी लिलाव प्रक्रिया सुरु होईल. पॅकेज सी साठी प्रतिसामना किंमत 17 कोटीच्या पुढे गेली आहे.
पाच वर्ष आयपीएल सामने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतील. आतापर्यंत स्टार स्पोर्ट्सवर सामन्यांचे प्रसारण व्हायचे. याच चॅनलचंन डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीमिंग व्हायचं. बदल इथे क्लिक करुन जाणून घ्या.
पॅकेज सी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यातील नॉन एक्सक्लूसिव राइट्स आहेत. पॅकेड डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार आहेत.
एक मॅचमधून होणाऱ्या कमाईत बीसीसीआयने लोकप्रिय फुटबॉल लीग इंग्लिशन प्रीमियर लीगला मागे टाकलं आहे.
पॅकेज ए भारतातील टीवी राइट्ससाठी आहे तर पॅकेज बी ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी आहे. पॅकेज ए ची किंमत 23,275 कोटी रुपये तर पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे.
44 हजार कोटी रुपयात टीवी आणि डिजिटल राइट्सची विक्री झाली असून सोनी आणि रिलायन्सने बाजी मारली आहे.
एकूण बोली 43,255 कोटी आहे. टीव्ही पॅकेज 23,575 कोटी रुपयांना आणि डिजिटल पॅकेज 19,680 कोटी रुपयांना विकले गेले.
टीवी राइट्सची प्रति मॅच 57.50 कोटी आणि डिजिटल राइट्सची प्रति मॅच 48 कोटी रुपयांना पुढच्या पाच वर्षांसाठी विक्री करण्यात आली आहे.
IPL चे टीवी राइट्सचे अधिकार सोनी नेटवर्कने विकत घेतल्याचं वृत्त आहे. याची अधिकृत घोषणा होणं, अजून बाकी आहे.