मुंबई: IPL मीडिया राइट्स (IPL Media Rights) लिलावात दोन पॅकेजचा लिलाव पूर्ण झाला आहे. ई-ऑक्शनच्या दुसऱ्यादिवशी टीवी राइट्सचा लिलाव झाला आहे. टीवी राइट्सची प्रति मॅच 57.50 कोटी आणि डिजिटल राइट्सची प्रति मॅच 48 कोटी रुपयांना पुढच्या पाच वर्षांसाठी विक्री करण्यात आली आहे. क्रिकबज वेबसाइटने हे वृत्त दिलं आहे. म्हणजे टीवी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरच्या (Digital Platform) एका सामन्यासाठी BCCI ला 107.5 कोटी रुपयांची रक्कम मिळेल. पुढच्या पाचवर्षांसाठी राइट्सचा हा लिलाव झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) 2023 ते 2027 साठी मीडिया राइट्स विकले आहेत. हा लिलाव पॅकेज ए आणि पॅकेज बी साठी झाला आहे. दोन वर्गातील एकूण रक्कम 43,255 कोटी रुपये आहे. पॅकेज ए ची किंमत 23,275 कोटी रुपये तर पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे. पॅकेज ए भारतातील टीवी राइट्ससाठी आहे तर पॅकेज बी ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी आहे. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे पॅकेज ए जिंकणारी कंपनी पॅकेज बी जिंकणाऱ्या कंपनीला एक कोटी रुपयाच्या अतिरिक्त रक्कमेसह चॅलेंज करु शकते.
एक मॅचमधून होणाऱ्या कमाईत बीसीसीआयने लोकप्रिय फुटबॉल लीग इंग्लिशन प्रीमियर लीगला मागे टाकलं आहे. या फुटबॉल लीगमधील प्रतीमॅच किंमत 81 कोटी रुपये आहे. पण आता आयपीएल यापुढे निघून गेलं आहे. लिलावाच्या पहिल्याच दिवशी आयपीएलने हा आकाड पार केला होता. आज दुसऱ्यादिवशी यावर शिक्कामोर्तब झालं.
बीसीसीआयने यावेळी लिलावाची चार पॅकेजमध्ये विभागणी केली आहे. पॅकेज ए, बी चा लिलाव पूर्ण झालाय. पॅकेज सी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यातील नॉन एक्सक्लूसिव राइट्स आहेत. पॅकेड डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार आहेत. आजच याचाही लिलाव पार पडणार आहे.